पवाचीच गोष्ट आहे, सकाळी ऑफिसला निघायचं म्हणुन तयार होऊन बुट घालत होतो. तर तेवढ्यात आमचं धाकटं कन्यारत्नाने ( वय वर्ष १५) एकदम हसणं सुरु केलं..
म्हंटलं काय झालं?
तर म्हणे की तुम्ही अगदी वॉचमन सारखे दिसताय आज.. अगदी तस्साच ड्रेस घातलाय तुम्ही.
मी एकदा स्वतःकडे , अन स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं.काळा रंग माझा आवडता -स्पेशली ट्राउझर साठी म्हणुन काळी ऍरोची ट्राउझर, स्काय ब्लू लाइअनिंगचा ऍरोचाच शर्ट, नेव्ही ब्लु कंपनी लोगो असलेला टाय (कस्टमर सेमिनार होतं म्हणुन, नाही तर मी टाय वगैरे वापरत नाही , नेहेमी सेमी फॉर्मल म्हणजे फुल स्लिव्ह शर्ट ट्राउझर्स मधे असतो.) लावलेला होता. आरशा समोर जाउन उभा राहिलो.. आणी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं.. तर समोर एक अर्धवट वयाचा पोट सुटलेला , ज्याने केवळ कंबरेला पट़्टा लावला आहे, म्हणुन पोट जागेवर आहे, नाहीतर कधीच खाली घरंगळलं असतं.. असा एक माणुस दिसला. पण वॉचमन?? छे!!!
एकदम लक्षात आलं, की हल्ली वॉचमन लोकांचा पण असाच ड्रेस असतो. स्पेशिअली मल्टीप्लेक्स , मॉल्स मधे.. स्ट्राइप्स असलेला शर्ट, आणि काळी किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर… ते लक्षात आलं आणि एकदम हसु आलं. टाय काढुन टाकला, अन कपाटाशी गेलो, तिथे जाउन दुसरा शर्ट घालायचा म्हणुन प्लेन आकाशी रंगाचा शर्ट काढला.
तर मागुन कॉमेंट ऐकु आली.. ’बाबा, कोरियर बॉय चा ड्रेस होतोय ’ हा शर्ट नका घालू..
तिच्याकडे जरा चिडुनच पाहिलं.. तुला काय करायचय? मी काही पण घालीन..
असं म्हंटलं खरं, पण एकदा तिने कॉमेंट टाकल्यावर मात्र तो शर्ट घालायची इच्छा झाली नाही. कपाटाशी उभा राहुन बरेच कपडे उलथा पालथ करुन शेवटी एक पांढरा शर्ट, नविनच घेतलेला (सेल मधे .. लुई फिलीप वर सध्या ५० टक्के डिस्काउंट आहे ) तो घालायला म्हणुन बाहेर काढला, आणि कन्यारत्नाकडे ’आता काय म्हणशील?? ” अशा नजरेने पाहिलं.
ती काहीच बोलली नाही, फक्त थोडं हसली… मला बरं वाटलं… चला बरं झालं!
पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं, मला वाटतं की मी शर्ट घालायची वाट पहात ती उभी होती . जेंव्हा शर्ट घालुन झाला, आणि जोव्हान वगैरे अंगावर उडवुन झाल्यावर टाय लावायला घेतला, तरीही ती काहीच बोलली नाही. मला खुप बरं वाटलं.. चला म्हणजे हाअ ड्रेस तरी चांगला आहे.. ना कोरियर बॉय , ना वॉचमन..
स्वतःशिच हासलो, अन पायात सॉक्स घालणे सुरु केले. ओठ शिळ घालत होते, सगळं काही व्यवस्थित झालं की कसं बरं वाटतं नां? आज सकाळीच मस्त ब्रेकफास्ट झाला होता. फोडणीची पोळी अन दही ( शिळी पोळी कुस्करुन फोडणीला घातलेली ( कांदे पोह्या सारखी) मला वाटतं त्याला मुंबईला पोळीचा चिवडा म्हणतात) माझं फेवरेट आहे ते.. बायकोने तिन वेळ चहा पण करुन दिला होता कुरकुर न करता..
तिने न बोलताच तिच्या मनातले विचार मला समजतात , ती नक्कीच मनातलया मनात म्हणाली असेल.. अरे किती चहा पितोस.. एका कपाला दिड चमचा साखर, म्हणजे दिवस भरात, तुझे १५ कप चहा गुणीले दिड चमचा म्हणजे जवळपास २२ चमचे साखर= २०० ग्राम साखर? इतकी साखर तुला आवश्यक नाही रे.. जरा चहा कमी कर… वगैरे वगैरे न एकावं लागल्यामुळे मी अगदी खुष होतो आज!
हं , तर काय सांगत होतो, तयार झाल्यावर मग घराबाहेर निघणार, तेवढ्यात मागुन हळुच आवाज ऐकु आला..
…….’ आई ,आपले (?) बाबा अगदी वेटर सारखे दिसतात की नाही आज ह्या ( काळी पॅंट +व्हाईट शर्ट + टाय) ड्रेस मधे??”
आणि नेमकं ते मला ऐकु आलं.. !!एवढा चांगला तयार होऊन घरून निघालो आणि ही अशी कॉमेंट!! आता काय करणार! तिच्याकडे पाहिलं, एक टप्पल द्यायला मागे वळलो, तर ती धावतच तिच्या बेडरुममधे गेली अन दार लाउन घेतलं.. !! मी पण हसतंच घराबाहेर पडलो..
थोड्या वर्षापुर्वी एक फॅशन होती. काय व्हायचं की पुर्वी लोकं सफारी घालायचे. म्हणजे ज्या कपड्याची पॅंट त्याच कपड्याचा शर्ट. त्याच्या खांद्यावर दोन पट़्ट्या किंवा समोर पॅच खिसा , असा काहीतरी ड्रेस होता तो. बरं फॅशन इतकी होती, की एखाद्या लग्नात वगैरे तर बरेचसे लोक असे सफारी घातलेले दिसायचे.बॅंड वाजवणारे पण असाच काहीतरी ड्रेस वापरायचे. कधी कधी या सफारीचा रंग पण अगदी बॅंडवाल्यासारखा असायचा. घालणाऱ्याची पर्सनॅलिटी अगदी छाडमाड असेल तर तर तो ड्रेस घालणारा आणि लग्नाच्या वरातीमधे बॅंड वाजवणारा, किंवा एखादा ऑफिस मधला चपराशी एकसारखेच दिसायचे.
या बाबतित स्त्रियांचं एकदम पक्कं असतं, की ठराविक साडी, मग यावर मॅचिंग असलेले इतर कपडे, मॅचींग बांगड्या.. इत्यादी.. त्या बाबतित त्या कधिच कॉम्प्रोमाइझ करित नाहीत. पुरुषांचं आपलं मिक्स ऍंड मॅच सुरु असतं नेहेमी.. काळी, राखाडी, किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर आणि कुठलाही पाइन स्ट्रिप शर्ट.. बस.. चलता है. एक पेअर ब्लॅक शु आणि एखादा स्निकर असला की झालं.. और क्या चा्हीये?
एक गोष्ट आहे..अगदी लहानशा गोष्टींचा किती परीणाम होतो नां आपल्यावर? प्रत्येक ड्रेस हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रोफेशनशी निगडीत केला जातो. मग तो ड्रेस इतरांनी वापरला तर लगेच त्या माणसाला त्या प्रोफेशनशी कोरिलेट केलं जातं. सह्ज जाणवलं म्हणुन इथे पोस्ट करतोय.

0 comments:
Post a Comment