लहान असतांना ” खोटी शप्पत घेऊ नकोस, नाही तर आई मरते “ अशी भिती घालून शपथ या गोष्टी बद्दल एक अकारण उत्सुकता, भिती मनात घातली जात असे. कितीही निगरगट्ट मुलगा असला, तरी पण आईची शपथ घेतांना थोडा काळजीपूर्वकच घ्यायचा. पण एकदा का कोणी आईची शपथ घेतली की त्यावर सगळे जण अगदी डोळॆ बंद करून विश्वास ठेवायचे.
खालच्या पोर्च मधे दोन मुलं खेळत होती, आणि मां की कसम ले, फिर मानूंगा असं काहीतरी बोलणं सुरु होतं. ते ऐकलं, आणि जाणवलं, की आपल्या लहानपणीच्या व्हॅल्युज अजूनही तशाच आहेत. इतक्या वर्षानंतर सुद्धा या कम्प्युटरच्या युगात पण आईच्या शपथेचं तितकंच मह्त्त्व आहे हे बघून गम्मत वाटली. लहानपणी खोटं बोलायचं असेल तर ’आई शपथ’ टाळून इतर कुणाची तरी म्हणजे ” देवाची शप्पत” घेउन वेळ मारून न्यायचो आम्ही. देवाची शपथ ही आईच्या शपथे इतकी पॉवरबाज मानली जात नसे.
मला आठवतं, आमच्या लहानपणी पण घरचे चिल्लर पैसे कधी दिसेनासे झाले, की आई ” तू घेतले नाहीस ना? मग घे माझी शपथ”, म्हणून शपथ घ्यायला लावायची . त्यातले जर पतंगी साठी पाच पैसे जरी घेतले असले, तरीही खोटी शपथ कधी घेऊ शकलो नाही . आपल्याला शिक्षा होणार हे माहीती असून सुद्धा मान्य करायचो की मीच घेतले पैसे म्हणून -. कदाचित म्हणूनच असेल की आता मोठं झाल्यावर पण खोटी शपथ घेतल्याने काही होत नाही हे समजल्यावर सुद्धा, आईची खोटी शपथ घेण्याची अजिबात इच्छा / हिम्मत होत नाही.
लग्न झाल्यावर बायको जेंव्हा आईच्या जागी असते, आणि घरून भांडून बाहेर गेल्यावर ” डबा संपव रे, माझी शपथ आहे तुला, असं म्हणते,आणि जो पर्यंत हो म्हणत नाही तो पर्यंत फोन ठेवत नाही तेंव्हा या एका शब्दाच्या मधल्या शक्तीची जाणीव होते. केवळ एक शब्द , ’तिची शपथ’ तुम्ही घेतली की ती निश्चिंत होते, की आता हा नक्की डबा संपवणार म्हणून. दुपारच्या लंच टाइम मधे बायकोचा चेहेरा डॊळ्यासमोर येतो आणि म्हणतो, माझी शपथ आहे तूला, तेंव्हा आपसूकच डबा उघडून खाणं सुरु केलं जातं.
लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जातांना पण डोळ्यात पाणी आणून, मी लग्गेच परत येते रे, तुझी शप्पत, असं म्हणत, जेंव्हा ती निघते, तेंव्हा रोज न चुकता दिवसातून चार दा फोन करीन म्हणून शपथ घ्यायला लावते, तेंव्हाच तिचा तो चेहेरा आणि भरलेले डॊळॆ आयुष्यभर लक्षात रहातात,शपथ मोडता येत नाही हा म्हणजे एक मनाचा खेळ आहे झालं!
जर एखाद्याची शपथ मोडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यु होत असेल तर मग, मी कसाबची खोटी शपथ घेतली असती ! सहज विचार केला की जर अजुन कोणी कोणाची शपथ घेतली असती बरं???
काही लोकांनी आपल्या बॉसची ,
मनमोहनने जनरल कयानीची,
शरदपवारांनी अण्णा हजारेंची ,
तेलगी ने शरद पवारांची ,
विलासरावांनी पृथ्वीराजांची.
जया बच्चन ने रेखाची,
शाहीद कपूर ने करीनाची,
उद्धव ने राजची,
सलमानने तर अगदी ऐश्वर्या पासून विवेक , ते कतरिना, ते रणवीर वगैरे वगैरे.. शपथा घेतल्या असत्या.भुजबळांनी, राणेंनी , आणि मुंडेंनी कोणाची घेतली असती ते तुम्हीच ठरवा. अर्थातच, ही यादी खूप मोठी होऊ शकते. पण खोटी शपथ घेतल्याने कोणी मरत नाही म्हणून बऱ्याच लोकांचा जीव वाचला असे म्हणावं लागेल.
जगात तुम्ही कुठल्याही भागात गेलात तरी, ह्या शपथेचे महत्त्व अगदी सारखे आहे अगदी अमेरिकेपासून तर टीम्बक्टू पर्यंत! शपथ, वचन, आणि पाप पुण्य ह्या कल्पना मला नेहेमीच गोंधळात टाकतात.
शपथेवर माझा अजिबात विश्वास नाही, पण आमचं न्यायालय मात्र अगदी डोळे झाकून विश्वास ठेवते. कोणीही असो, अगदी तो कसाब जरी असला, आणि त्याने शपथेवर कुराणावर हात ठेवून खोटं सांगितलं की तो हल्ला करणारा मी नव्हेच.. तरी पण आपली न्याय व्यवस्था तो खोटं बोलला हे माहीत असूनही त्याला काही करणार नाही, उलट त्याच्यावर केस लढवत बसते वर्षानुवर्ष- कारण कायद्यामधे तशी तरतूद नाही.
शपथ घेऊन खोटं बोललं तरी न्यायदेवतेसमोर चालतं. तिथे बोलतांना खोटी का होईन ती गीतेवर, कुराणावर हात ठेवून समोर शपथ घ्यायची , की झालं. शपथे सारखी एखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना पण त्यावर न्यायालय विश्वास का बरं ठेवते? हा प्रश्न नेहेमीच पडतो. किती मजेशीर आहे ही गोष्ट नाही??
लग्नामधे पण होम सुरु असतांना ’ नाती चरामी अहं” अशी शपथ घ्यावी लागतेच- किती लोकं ती पाळतात हा प्रश्न आहेच म्हणा! सचीन तेंडूलकर पण सारखा आईशपथ म्हणतच असतो. हे राजकीय नेते जेंव्हा एखाद्या पदाची शपथ घेतात तेंव्हा त्यांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. अशी शपथ घेतली की मग “आदर्श” सारखी कामं केली जाऊ शकतात. कोणाला काही सांगायची गरज नाही- कारण शपथ घेतली आहे ना गोपनीयतेची!

शपथ म्हणजे एक खेळ आहे, असा खेळ जो ’खेळ’ तुमच्या भावनांशी खेळतो आणि तुमच्या मनावर तुमच्या नकळत राज्य करतो!! गाडी खाली चालणारा कुत्र्याला असे वाटते, की गाडी आपणच खेचतोय.. तसंच तुम्हाला वाटत असतं की हा खेळ आपण खेळतोय, पण प्रत्यक्षात तो खेळच तुमच्या मनाशी खेळत असतो…….!
0 comments:
Post a Comment