परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला पाहिलं आणि , खरंच हीच का ती ? ही शंका आली. वया बरोबरच झालेले बदल सगळ्या शरीरावरच दिसत होते.असो… आणि तिला पाहिल्यावर सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. तिने मला पाहिले आणि हसून इकडे ये म्हणून इशारा केला. हा नातू बरं का.. माझ्या मोठ्या मुलीचा मुलगा. घरी नक्की ये रे.. नवऱ्याशी ओळख करून देते बघ तुझी.. पण मी मात्र कामाच्या घाईत असल्याने दोन मिनिट बोलून आणि नंतर पुन्हा सावकाश भेटायचं प्रॉमिस करून निरोप घेतला. एक जूनी मैत्रीण.. पण खरंच ती मैत्रिण होती का? हा प्रशन मनात घोळवत कामाला लागलो.
मैत्रिण हे हेडींग वाचल्यावर तुमच्यातले अर्धे लोकं तरी या पोस्ट मधे काहीतरी मसालेदार वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने वाचणे सुरु करतील- पण तसे यात काही सापडणार नाही. माझ्या वयाच्या पुरुषाने मैत्रिणी बद्दल लिहावं म्हणजे खरं तर थोडं विचित्र वाटतं नाही का? मैत्रिण हा प्रत्येकाच्याच जीवनाचा एक हवा हवासा वाटणारा अविभाज्य अंग असतो. खरं तर मैत्रिण या शब्दा मधेच एक मोठं काव्य दडलेलं आहे- यावर खंडकाव्य नक्कीच होऊ शकतं पण आज पर्यंत तरी कॊणी मैत्रिणीवर कविता ( मला अभिप्रेत असलेल्या)लिहिलेल्या नाहीत. नुसतं मैत्रिण हा शब्द जरी उच्चारला तरीही आवाज हळूवार होतो- कापरं भरतं.. कसं मस्त पैकी पिसा सारखं हलकं हलकं वाटतं…. खरं की नाही??
मैत्रिण या शब्दाचा आशय वयानुरुप बदलत असतो. खरं तर स्त्री कडे पहाण्याची नजर वयानुसार बदलत असते. लहान असतांना केवळ तीन रुपात मुलींकडे पाहिले जाते. पहिला आई, दुसरा बहीण, तिसरा म्हणजे बायको. पण जेंव्हा ९वीत वगैरे असतो, तेंव्हा तर बायको हा प्रकार अशक्य आणि कल्पनेच्या पलिकडचा असतो - पौगंडावस्थेतील वय – म्हणून मग फक्त एकाच रुपात मुलींकडे पहिले जाते . मी पण याला अपवाद नव्हतो.
शाळेत तर अजिबात मुली नव्हत्या. को एड शाळा नव्हती, पण आमचं घर कन्या शाळेजवळ असल्यामुळे दररोज आमच्या घरा समोरून सगळ्या “शिरोडकरांचा” राबता असायचा. माझी जी “शिरोडकर” होती, ती मात्र समोरून गेली की खाली मान घालायची आणि लाजून निघून जायची. कधी तरी पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिले की मी अगदी कृतकृत्य होत असे. त्या दिवसात बोलणं तर दूरच पण नुसतं पाहून हसणं पण शक्य व्हायचं नाही. मुलीशी बोलतांना कोणी पाहिलं तर ?? हा प्रश्न पण असायचा.
बरं, शेजारी रहाणाऱ्या सगळ्या मुली सुंदर जरी असल्या तरी त्या मुलींना अगदी लहानपणापासून फ्रॉकला पिनने रुमाल अडकवलेले, भरलेल्या नाकाने पाहिलेले असल्याने , त्यांच्या बद्दल तशी भावना कधीच निर्माण झाली नाही- त्यांच्याशी बोलणं व्हायचं, पण त्या मैत्रिणी मात्र कधीच झाल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीशी बोलणं हा कमीपणा समजला जायचा. पौगंडावस्थेतील वय, हवी हवीशी वाटणारी मैत्रिण, पण प्रत्यक्षात मात्र कधी कोणी मिळालीच नाही.. कधी खरं बोलण्याची हिंम्मत झालीच नाही. खऱ्या मैत्रिणी मिळाल्या त्या नोकरी लागल्यावरच!
माझा एक खास मित्र होता , त्याचं नांव लिहत नाही, कारण कदाचित त्याची मुलगी पण हा ब्लॉग वाचत असेल . तर त्याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. ती तशी , त्याच्या घराजवळच रहायची, एकदा त्याने ’ ती’ ला दाखवले, आणि म्हणाला कशी दिसते? आता १५-१६ वर्ष वय असतांना कुठलीही मुलगी सुंदरच दिसणार.. पण नंतर मात्र तो जाम पिडायला लागला. ती असं म्हणते, मी तसं म्हणतो वगैरे वगैरे. तिच्या प्रेमात अक्षरशः पागल झाला होता तो! तिचं एक कोड नेम ठेवलं होतं आम्ही, की ज्या मुळे कोणाही समोर तिच्याबद्दल बोललं तरी चालायचं. असो विषयांतर होतंय, पण आमच्या वेळचे दिवस थोडक्यात लक्षात यायला हवे, म्हणून ही आठवण लिहिली आहे.
कट्ट्यावर जाऊन बसणे आणि फुल टू टीपी करणे हा एक नेहेमीचा उद्योग ! संध्याकाळचे सहा वाजले की कट्ट्यावर जाऊन बसायचे आणि गप्पा मारत उभे रहायचे. मस्ती करण्यावर पण मर्यादा होत्याच- कारण थोडाही टारगट पणा केला, तर घरी बातमी पोहोचेल ही खात्री -आणि मग मार बसणार हे पण नक्की! कट्टा नसेल तर. किंवा समोरच्या मैदानात क्रिकेट खेळणे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर , ” ही तुझी, ती लाल वाली माझी, ती हिरवी शाम्याची ” वगैरे कॉमेंट्स तर ठरलेल्या. मला वाटतं की त्या मुलींना पण ते आवडत असायचं. कधी अरे काल तू हिरवी घेतली होतीस, आज हिरवी माझी.. वगैरे.. … पण कॉमेंट्स व्हायच्या.
त्यातलीच एक सुबक ठेंगणी समोरून गेली की मित्र ’अरे वहिनी चालली बघ’ म्हणून आवर्जून तिच्याकडे लक्ष वेधून द्यायचे- आणि ते पण तिला ऐकू जाइल इतक्या मोठ्या आवाजात. ती लाजायची, आणि मला पण उगाच लाजल्या सारखं व्हायचं. अजून एक मुलगी होती तिच्यावरून मला मित्र चिडवायचे- एखाद्या मुलीच्या नावाने चिडवलं जाण्यातलं सुख समजेल आजच्या पिढीला?
माझा एक मित्र होता, नितीन ( आडनांव मुद्दाम लिहत नाही) तो तर तुझी ती मैत्रीण कोण आहे हे सांग म्हणून खूप मागे लागायचा. पुढे काही वर्षानंतर नोकरी लागली आणि मग केवळ सुटी मधे घरी जाणं व्हायचं. मग तेंव्हा एक दिवस ती कडेवर बाळ घेऊन किंवा नवऱ्याच्या सोबत स्कुटर वर फिरतांना दिसली की -धत तेरी की.. झालं वाटतं लग्न हिचं…. छाती मधे कसंसंच व्हायचं. ती पण पहायची , आणि हलकेच स्मित देऊन पुढे जायची. एकही शब्द न बोलता सुरु झालेली मैत्री ही अशी केवळ स्मित हास्यावर संपायची .
मुलींशी नुसतं बोलणं पण शक्य नसायचं. एखादी सखी शेजारीण उगाच आवडायची. सुटी मधे वगैरे सगळ्यांकडेच पाहुणे यायचे. तो म्हणजे आमचा प्रेमात पडण्याचा काळ. शक्य तितक्या प्रकारे प्रयत्न करून एका तरी मुलीशी मैत्री करायचीच हे ठरवले जायचे. सुटी लागली, की मित्रं पण ” सुटी मधे काय काय केलं ते सांग बरं का – आणि मी पण तुला सांगीन ” म्हणून आणा शपथा घालायचे. पण त्या ही वयात काय बोलावं आणि काय बोलू नये ते आपसूकच समजत होते. आणि कोणीच एकमेकांना काही सांगत नसे.
नंतर नोकरी सुरु झाल्यावर खऱ्या मैत्रिणी मिळाल्या. ट्रेकिंग , हे मुख्य कारण! आमचं ट्रेकिंग गृप दर गुरुवारी ट्रेकला जायचा. नेहेमीचे ठरलेले लोकं असायचे. मुली – तसेच मुलं पण. एकाच आवडीने भारलेले आम्ही मित्र मैत्रिणी दर गुरुवारी भेटायचो. जर ट्रेक नसेल तर कुठे तरी एकत्र जाऊन सिनेमा पहाणे वगैरे प्रोग्राम असायचा.. एक लायब्ररी होती, त्या लायब्ररी मधे पण शेजारी रहाणारी एक मुलगी नेहेमी भेटायची, तसं कधी बोलणं झालं नव्हतं, पण मग समान वाचनाची आवड म्हणून तिच्याशी मैत्री झाली होती. वपुंचं पार्टनर मी हजारेक वेळा तरी वाचले असेल. तिलाही ते पुस्तक खूप आवडायचं- अगदी भर भरून बोलायची. वपूंचं नाव निघालं की. एक निखळ मै्त्री असलेली मैत्रिण म्हणजे काय ह्याचा अनुभव मला तिने दिला. दुनियादारी मधल्या कुठल्या पात्राशी स्वतःला कोरीलेट करतोस म्हणून तिने एकदा विचारले होते.. आणि माझे उत्तर होते श्रेयस..
मैत्रिण म्हंटलं हल्ली लोकांच्या मनात फक्त एकच भावना निर्माण होते. आपल्याकडे मैत्रिणी फार कमी असतात, पण मानलेले भाऊ , बहीण खूप असतात. माझं स्पष्ट मत आहे, की सख्ख्या भाऊ बहीण या नात्यांशिवाय सगळी नाती एकदम खोटी- बेगडी असतात.कुठल्याही नात्याचे नांव न देता मैत्री होऊ शकत नाही का? सहज शक्य आहे ते- अगदी कुठलाही नात्याचा मुलामा न चढवता केवळ मैत्री नक्कीच होऊ शकते. मग हा उगीच मनाचा खोटे पणा कशाला?? उगीच मानलेला भाऊ, मानलेली बहीण अशा नात्यांमध्ये मैत्रिणी चे नितांत सुंदर नाते लपेटून त्या मधल्या सुंदर नात्याची आहुती का म्हणून दिली जाते? मला वाटतं की याचं कारण म्हणजे आपण ज्या मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढलो – ते आहे. एक मुलींशी बोलणे, मैत्री करण्यासाठी वापरला जाणारा सेफ मार्ग म्हणजे मानलेले नाते . बरेचसे लोकं हा मैत्रिण हा शब्द अगदी अस्पृष्य असल्या प्रमाणे समजून केवळ मैत्रिण या नात्याचा – रस्ता बंद करून टाकतात आणि एका निर्भेळ आनंदाला आपल्या आयुष्यात मुकतात.
मैत्रिण म्हंटल्यावर तिला तू आज सुंदर दिसतेस बरं कां.असं तुम्ही म्हणू शकता का? जर उत्तर होय असेल, तर तुमची मैत्री निकोप आहे असे मी म्हणेन. मैत्रिण म्हणजे गर्ल फ्रेंड, बाईक वर मागे बसून फिरणारी, मे बी फ्युचर लाइफ पार्टनर -असा अर्थ मनात धरणाऱ्या लोकांना मैत्रिण या शब्दाचा खरा अर्थ समजलाच नाही . अशी मानसिकता असणारी मुलं एका सर्वांग सुंदर वेगळ्याच नात्याला मुकतात. ज्यांच्या खऱ्या मैत्रिणी /मित्र आहेत त्यांच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते.
स्वतःला पण जेंव्हा खरंच चांगल्या मैत्रिणी मिळाल्या तेंव्हा मात्र , – आणि निरपेक्ष मैत्री मधला आनंद समजला. आता या वयातही मैत्रिणी मित्र असणे काही वावगे आहे असे मला वाटत नाही. स्त्री आणि पुरुष या नात्यांमधला एक वेगळा ’अनडिफाइन्ड टोन” ज्याला समजला त्याला मैत्रिणीचे हे नाते म्हणजे काय ते समजू शकेल. सेक्स्युअॅलिटी ही फक्त सेक्स पुरतीच मर्यादित असते असे नाही. अर्थात हे समजणे किंवा लक्षात येणे फार कठीण आहे, पण अशक्य मात्र निश्चितच नाही..

मैत्रिणीच्या नातं हे एकच नातं आहे की ज्या नात्यातून आपली नैतिक उन्नती होऊ शकते. नैतिकतेची खरी शिकवण ह्या नात्यातून मिळू शकते . स्त्री कडे पहातांना केवळ एकाच नजरेने न पहाता एक व्यक्ती म्हणून पहाण्याची सवय या नात्यातून कल्टीव्हेट होऊ शकते. नैतिक उन्नती साठी का होईना, पण जसे आपल्या कडे स्त्रियांसाठी ३३ टक्के रिझर्वेशन नोकरी, शाळा, कॉलेज अॅडमिशन्स मधे ठेवलेले आहे, त्याच प्रमाणे आपल्या जीवनात पण ३३ टक्के मैत्रिणीं साठी ठेवणे आवश्यक आहे )म्हणून म्हणतो, हे नातं कसं श्री्कृष्णाच्या सखी सारखे असावे, द्रौपदीचा सखा असल्याप्रमाणे असावे..
0 comments:
Post a Comment