एखाद्या कामात अपयश आल्यास भीती वाटते व ताण निर्माण होतो. घाबरलेला माणूस ते कामच सोडून देतो. भीतीमुळे कार्य सोडणे चूक आहे. प्रबळ इच्छाशक्ती बाळगा आणि तेच काम पूर्ण करून टाका. यश नक्की मिळेल आणि पुढच्या वेळेला तुम्ही घाबरणार नाही.
जर तुमच्या मनावर ताण आला, तर मन शांत करून विश्रांती घ्या, आडवे व्हा आणि दीर्घ श्वास घेऊन विचार करा की, भीतीची किंवा रागावण्याची जरूर आहे काय? मन प्रसन्न ठेवल्यास सर्व प्रश्न सुलभपणे सुटतात. मनात खळबळ माजली असेल, तर शरीर सैल करून आडवे व्हा किंवा बसा. हे तंत्र वापरून तर पाहा. ज्यामुळे मनावर ताण येतो, त्याच्या विरुद्ध भावना मनात निर्माण करा.
समजा तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते. त्यामुळे तुमच्या मनावर ताण येतो. त्यावेळी विचार करा की, इंजेक्शन अगदी लहान बालकांनाही टोचतात. त्या बालकाला जर नंतर त्रास होत नाही, तर तुम्हालाही नंतर त्रास होणार नाही. न्यायालयात साक्ष देताना साक्षीदार घाबरतात. त्याच्या मनावर ताण असतो. त्यावेळी असा विचार करा की, येथे न्यायाधीश, वकील, पक्षकार इतकेच तर लोक आहेत. ही काही कोणी राक्षस नाहीत. आपल्यासारखीच माणसे आहेत. हे सर्व जण शिस्तीत वागणारे आहेत. मग तुम्ही साक्ष द्यायला घाबरायचं कशाला? अनेक उमेदवार मुलाखत देताना घाबरतात. त्यावेळी तुम्ही मनात आणा की, मुलाखत घेणारे आपल्यासारखे तर आहेत.
त्यांना शिंगंबिंगं नाहीत. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. ज्यांना तुम्ही भयंकर व भीतिदायक खुनी समजता, तेसुद्धा खरोखर तुम्ही समजताइतके वाईट नसतात. तुमच्या मनातील कल्पनेमुळे तुम्ही त्यांना घाबरत असता.
काही कामे करावी तर लागतातच; पण त्या कामात अपघाताची व अनिष्ट होण्याची भीती असते किंवा अपयशाची भीती वाटते. त्यावेळी तुम्ही असा विचार करा की, अजून तर अपघात किंवा संकट आलेले नाही ना? येईल तेव्हा त्याचा सामना कसा करायचा, याचा विचार करू. पुलापाशी पोहोचल्यानंतर

0 comments:
Post a Comment