Powered by Blogger.

Tuesday, 10 April 2012

मुलाखतीतले सामान्य प्रश्न्र

·         तुमच्याबद्द्ल काही सांगा?
(टेल मी समथींग अबाऊट युअरसेल्फ) या विशेष प्रश्नाकरीता बायोडाटा व्यतिरिक्त या नोकरीकरिता उपयुक्त असणारे स्वतबद्दलचं तुम्ही काय सांगू शकता, हे पाहिले जाते. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी वारंवार याचे उत्तर देण्याची तयारी करा.
  • इथे का काम करायचे आहे? नेमकी कारणे द्या. त्यात अजून चांगला अनुभव आणि संस्थेसोबत स्वतःची प्रगती असेही सांगता येते.
  • पगाराची काय अपेक्षा आहे? - मोकळेपणाने अपेक्षा सांगा. येथे लाजू नका.
  • तुमच्या खुबी आणि तुमच्या कमतरता कोणत्या? - कोणतेही काम वेळेवर आणि परिपूर्ण करणे, कामाकडे लक्ष देणे, नव नवीन गोष्ती शिकणे, कंपनीच्या पद्धतींचा अभ्यास करण्याची हातोटी असणे, साध्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी समजावता येणे, फोनवर सहजतेने बोलता येणे अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. कमतरता सांगताना त्यातही चलाखीने खुबीच सांगा - जसे की, 'मला कोणतेही काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे मला पर्फेक्शनिस्ट मानले जाते. अर्थातच मी कामाचा जरा ताण घेतो.'
  • अगोदरची नोकरी का सोडत आहात? - जे कारण आहे ते स्पष्टपणे द्या. वेळ कुणावरही आलेली असते.
संस्थेला किंवा कंपनीकरिता तुमचे योगदान काय असेल हे योग्यपणे सांगितले तर चांगले गुण प्राप्त होतात.वरील मुद्द्यांचा उपयोग केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी परीक्षांमध्येही होऊ शकतो. अशा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी कळीचे मुद्दे या विषयक दृष्टिकोन भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्यांला समकालीन बाबींची जाण स्वत:ची स्पष्ट भूमिकादेखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही ते पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्यांची देहबोली, भाषा, संवादकौशल्य, विचारातील स्पष्टता, आत्मविश्वास या बाबी मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी करता येते.



मुलाखत घेणारे खऱ्या अर्थाने तज्ज्ञ आणि चाणाक्ष असतात. एकच प्रश्‍न विविध रूपांत विचारण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. थोडक्‍यात म्हणजे समोरच्या फलंदाजाची खरी "टेस्ट' घेण्यासाठी या महागुरूंची गोलंदाजी होत असते. प्रश्‍नांची धाटणी बदलली की काही उमेदवार उत्तर माहीत असूनही गडबडतात.
मुलाखतीच्या वेळी विचारले जाण्याची शक्‍यता असलेल्या प्रश्‍नांचे स्वरूप अभ्यास करून समजले. पण रूप कसे असेल याचा अंदाज येत नाही.

साधारणपणे बहुतांश उमेदवारांची तयारीच्या अंतिम टप्प्यात ही अवस्था जाणवते. ज्या विविध बाबींवर (एरियास, बायोडेटा, इत्यादी) प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. त्यांचे वर्गीकरण, ज्ञान आणि उत्तराचा आराखडा तयार असतो. त्यामुळे प्रश्‍न कोणत्या स्वरूपाचे असतील याचा अंदाज आलेला असतो. यासाठी प्रश्‍न कोणकोणते वेगळे रूप धारण करून येऊ शकतात याची माहिती प्रश्‍नांचे प्रकार :
  • शेपूट नसलेले प्रश्‍न? (ओपन एन्डेड) :
    हे प्रश्‍न खरोखरच अंत नसलेले (किंवा आपला अंत पहाणारे?) असू शकतात. प्रश्‍न रूपाला म्हणजे दिसायला एकदम सरळ, सोपा परंतु उत्तराची व्याप्ती ठरविणे अवघड असते. उदाहरणार्थ : अ) तुमच्याबद्दल काय सांगाल? (टेल मी अबाऊट युवर सेल्फ) ब) आम्ही तुमची निवड का करावी? समजा (ब) प्रश्‍नाच्या उत्तराचा विचार केला तर काय अपेक्षित आहे? निवड होऊ शकणाऱ्या पदाच्या विविध जबाबदाऱ्या माहीत असणे, या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्‍यक असलेले गुण, आवश्‍यक गुणांपैकी उमेदवारांकडे कोणकोणते गुण आहेत आणि या गुणांचा उपयोग कार्यभार सांभाळण्यासाठी तुम्ही कसा कराल, या सर्व बाबी तुमच्या उत्तरात असणे श्रेयस्कर ठरते.
  • अंतिम ध्येयाचा (गोल) वेध घेणारे प्रश्‍न :
    ज्या पदाच्या निवडीसाठी मुलाखत देत आहात त्या पदावर पूर्ण क्षमतेने काम करण्यात तुम्हाला खरोखरच रस आहे का? यासाठी या प्रकाराचे प्रश्‍न असतात. काही उमेदवारांचे अंतिम ध्येय वेगळे पद, करिअर असते आणि ते साध्य होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था (स्टेपिंग स्टोन) म्हणून हा प्रयत्न असतो. असे उमेदवार पूर्ण कमिटमेंटने काम करीत नाहीत. "स्टॉप गॅप अरेंजमेंट'साठी मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना निवडण्यात मुलाखतकारांना स्वारस्य नसते. तेव्हा प्रश्‍नाच्या उत्तरात आपले ध्येय आणि पदाचा कार्यभार या दोन्हींची सांगड घालून कार्याला पूर्ण न्याय देत आपले ध्येय कसे साध्य होऊ शकते हे सांगावे.
  • दिशादर्शक (लीडिंग) प्रश्‍न :
    अशा प्रश्‍नांमध्येच उत्तराची सर्वसाधारण दिशा दिग्दर्शित असते. एकदा दिशा समजली की उत्तराचे स्वरूप ठरविता येईल.
  • थेट (डायरेक्‍ट) प्रश्‍न :
    हे प्रश्‍न सरळ, साधे परंतु "स्पेसिफिक' असतात. उत्तरही नेमके आणि मुद्देसूद हवे. जास्त पाल्हाळ, फापटपसारा नको. कमी वेळात कमी शब्दांत सखोल आशयाचे उत्तर असावे. उच्च पदावर, जनसंपर्क पदावर किंवा मोठ्या टीममध्ये काम करण्याची क्षमता दर्शविणारे हे उत्तर असते.
  • बिकट (प्रिडीकयामेंट) प्रश्‍न :
    एखादी अवघड परिस्थिती देऊन तुम्ही मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग (ऍप्लीकेशन) करत या बिकट स्थितीचा सामना कसा करणार हे तपासले जाते. या प्रश्‍नाच्या नेमक्‍या उत्तरापेक्षा तुमची सकारात्मकता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्‍निक, दृष्टिकोन, इतरांविषयीची आत्मीयता इत्यादी अनेक गुणांचा परिचय करून घेण्यात मुलाखतकारांना जास्त रस असू शकतो.
  • संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न :
    एखादा द्रुतगती गोलंदाज फास्ट बॉल टाकण्याच्या ऍक्‍शनमध्ये अचानक स्लो बॉल टाकून उत्तम फलंदाजाची परीक्षा घेतो. तद्वतच हा प्रकार समजावा. मुद्दामहून गोंधळात टाकणारे हे प्रश्‍न तुमच्या संयमी स्वभावाची ऐनवेळी आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता तपासतात.
  • आपणच निर्माण केलेले प्रश्‍न :
    काही उमेदवार इंप्रेशन किंवा जास्त नॉलेजेबल दिसावे म्हणून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देताना विनाकारण इतरही माहिती सांगत बसतात. वस्तूतः त्या इतर माहितीचे सखोल ज्ञान किंवा त्याबद्दलच्या इतर अनुषंगिक गोष्टी उमेदवाराला ज्ञातच नसतात. परंतु, मुलाखतकार मात्र यावर आधारित सखोल प्रश्‍न विचारू शकतात. हे अडचणीचे प्रश्‍न आपणच निर्माण करतो. हे टाळले पाहिजे.
  • पूर्वानुभवावर आधारित प्रश्‍न :
    पूर्वीच्या ठिकाणी, पदावर काम करताना वाईट अनुभव आलेले असू शकतात. परंतु, त्याचा उल्लेख व इतरांवर दोषारोप न करणे फायद्याचे होते. फर्गेट ऍण्ड फर्गिव्ह हे लक्षण उत्तम व प्रगल्भ व्यक्ती निर्देशक आहे.
    रॅपीड फायर, स्ट्रेस कॅपिसिटी प्रश्‍न
    बुध्यांक (आय क्‍यू) तसेच तणाव व्यवस्थापन क्षमता पारखण्यासाठी हे प्रश्‍न असतात. तातडीने निर्णय घेण्याची कुवत सिद्ध होते.
  • गुण-दोष (स्ट्रेंग्थ ऍण्ड विकनेस) समजाचे प्रश्‍न :
    गुणांची यादी सांगताना वाहवत जाऊ नये. दोष सांगताना चांगले दोष सांगावेत.

0 comments:

Post a Comment