प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते 'चुकले' नाही,ते फक्त कागदाच्या तुकड्यावरच बोलतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,माझा स्पर्शही तुला सांगू शकला नाही,तुला 'त्या'च्याबरोबर पाहूनही हाताने सीमा राखली होती,ते फक्त कल्पनेतच जागे होतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,माझ्या श्वासही खोटेच बोलत होता,शरीराचा अंत पाहूनही ते वळले नाही,ते फक्त 'पडद्यावरच' वळतात.तु फक्त 'लाल-हिरव्या कागदासाठी' माझा हात सोडला,तोच तुला माझ्या प्रेमपत्रापेक्षा जवळचा वाटला,तेव्हा मीही तो प्रेमाच्या तराजुत तोलला,आजतर मलाही ह्रदय हलके वाटायला लागले,पण आता फार उशिर झाला होता, प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळला होता.
0 comments:
Post a Comment