चिमनरावांची डायरी…
बुधवार – एका शुजच्या दुकानदाराला मुर्ख बनविले.
एका जोड्याच्या किमतीत दोन जोडे खरेदी केले.
( त्याने एकाच जोड्यावर किंमत लिहिली होती.
दुसऱ्या जोड्यावर बहुधा तो किंमत लिहिण्याचे विसरला असावा )
गुरवार – औषधीच्या दुकानातून मालकाने कामावरुन काढून टाकले.
त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते.
पण काय करणार बॉटल प्रिंटरमधे जात नव्हती.
शुक्रवार – रात्री खुप हसलो,
पांडेजीने बुधवारी सांगितलेला विनोद फार चांगला होता.
शनिवार – पाऊस आला आणि संध्याकाळी पावसात झाडांना पाणी द्यायचं काम पडलं.
रविवार – वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो.
सगळं गाव पालथं घातलं पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही
0 comments:
Post a Comment