Powered by Blogger.

Tuesday, 28 February 2012

Computer शॉर्टकट्स

Saturday, 25 February 2012

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते

"बघतोस काय ? मुजरा कर .....! " बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!


"बघ माझी आठवण येते का ?" ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

*
*

*साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस*.


अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही


"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"'


तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'


'अहो, इकडे पण बघा ना...'

"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".


थांब लक्षुमी कुंकू लावते!


तुमचे लक्ष आमच्याकडे का?


"लायनीत घे ना भौ"


चिटके तो फटके!


राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

*
*

*अयोध्या,**बेळगाव्,**कारवार्,*
*निपाणि,**इंदौर्,**गुलबर्गा,**न्यू जर्सी,**
ह्युस्टन,**सॅन्टा क्लारा,**सनिव्हेल,**फ्रिमॉन्ट्,**हेवर्ड,**बिजिंग
ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.*


१३ १३ १३ सुरूर !


"नाद खुळा"


"हाय हे असं हाय बग"


आई तुझा आशिर्वाद.


"सासरेबुवांची कृपा "


"आबा कावत्यात!"


पाहा पन प्रेमाणे


नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.


"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"


अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.


हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...


योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..


वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.


गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

हेही दिवस जातील


नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा


घर कब आओगे?


१ १३ ६ रा


सायकल सोडून बोला


हॉर्न . ओके. प्लीज


"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"


नानाचा जोर...पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु



*एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून*)

तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं

माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं

याचा विचार करून गाडी चालवा



*बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये-*-

सुसाईड मशिन

मिसगाईडेड मिसाईल

मॉम सेज नो गल्स

बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...



*एका ट्रक च्या मागे लिहले होते:*

*राजू**, **चिंटू **, **सोनू ....!*

*अणि खाली लिहले होते .....*

*बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !*

* *

*एका टेम्पोच्या मागे लिहिलेले*: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " *आणि खाली
लिहिले होते.*...

"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)



*अजस्त्र डंपरच्या पाठीमागे*

उगीच हॉर्न वाजवू नये

तुला चिरडायला एक सेकंद पुरेल



*एका टेम्पोच्या मागे.*.

*आलात आनंद**, **बसलात अत्यानंद**, **उतरलात परमानंद*!



लोभ असावा

नवीन बाई

मुलगा - आपल्या शेजारी ती नवीन बाई राहायला आली आहे तिचे नाव डार्लिंग आहे का?
आई - नाही बेटा
मुलगा - तू जेव्हा भाजी आणायला गेली होतीस तेव्हा पप्पा तिला डार्लिंग
डार्लिंग म्हणून हाक मारत होते


पाईप पाईप
पोर पोर
पाईप...पोर
पाईप
पोर
आता तुम्ही विचार करत असाल,कि हा काय प्रकार आहे....???
......अहो काही नाही हो...
नेपाली त्याचा फोन नंबर देत आहे..."५५४४५४५४"

नेपोलियन - माझ्या dictionary मध्ये impossible हा शब्दच नाहीयेत.
गण्या - आता रडून काय फायदा ? विकत घेतली तेंव्हाच चेक करायला हवे होते.


आत्महत्येचे दोन मार्ग झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या. गळ्यात अडकवा. छताला लटका! .....................रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या. ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा!!!!

गण्या बस स्टॉपवर उभा होता.एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"..'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!


एक बच्चा बहुत देर से रो राहा थामां ने पुछा"मेले लाल को क्या चाहिये???". . . toffee biscuit या chocolate ? ? ?अभी बच्चे का जवाब सुनो... . . its too gud.... .. . .
बच्चा : बस एक सनम चाहिये ए ए ए आशिकी के लिये...!!!

वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पावआणि अंडी घेऊन यायचो...
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!


शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.



प्रपोज करण्याची नवीन पद्धत.मिकू : तुझं नाव गूगल आहे का?चिंकी : नाही ..का?मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....

मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली.मित्र : मग ? काय झालं शेवटी ?मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !


टीचर : या ओळीचे इंग्लिशमध्ये भाषांतर करा. त्याने त्याचे काम केले आणितो ते करतच राहिला.
संता : ही डन हिज वर्क अँड डन डना डन डन डना डन...

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??.....
.
.
.
.
.
.
मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा

निर्लज्ज व्हा. सुखी व्हा

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून
दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन
कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला
काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार
उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू?
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली
तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.

बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो.
नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते,
ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी
फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही
किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले
ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर
होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून
दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt
+ Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी.
फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत.
बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात...
मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने
पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे
किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून
८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार
होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला
येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच
ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या
भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे
की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या
कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे
आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८
जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस
आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?

तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या
डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण
नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा
चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या
गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो
तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली".
तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस
येतात.)

घटना १ समाप्त

बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे
जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला
गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच
महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा

Thursday, 23 February 2012

बिल गेट्‍स यांचे 11 नियम

बिल गेट् यांचे 11 नियम
बिल गेट् यांचे 11 नियम :-
नियम 1.जीवन चांगले असेलच असे नाही. त्याचा चांगला वापर करायला शिका.
नियम 2.जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.
नियम 3.शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल उच्च पदापर्यंत स्वत: उडी घ्यावी लागेल.
नियम 4.तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
नियम 5मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.
नियम 6तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत. त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.
नियम 7तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा.
नियम 8तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे की, ‘नापासहा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे. त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार करता यशाचीच कास धरली पाहिजे.
नियम 9जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.
नियम 10टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय आहे ते कळते.
नियम 11आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते