Powered by Blogger.

Sunday, 29 April 2012

वेब डिझाईन

गेल्या दोन दशकात इंटरनेटने अभूतपूर्व प्रगती करून जगातील सार्‍या लोकांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. केवळ परस्पर संपर्कच नव्हॆ तर धर्म, भाषा, रूढी या कृत्रिम भेदांच्या व स्थान व वेळ या नैसर्गिक बंधनांच्या बेड्या तोडून जगातील ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले आहे. साहजिकच यामुळे सर्व क्षेत्रांतील ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असून उद्योग व्यवसायासाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. अर्थात स्पर्धाही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. टेक्नॉलॊजीमध्ये विलक्षण वेगाने बदल होत असून जुन्या पद्धती नामशेष होत आहेत.

इतर क्षेत्राप्रमाणे खुद्द इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्येदेखील फार फेरबदल होत आहेत. कॅमेरा, टीव्ही, मोबाईल, नोटबुक, आयपॅड, लॅपटॉप यासारखी नवी संगणक उपकरणे व त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, माहिती साठविण्याच्या व वितरण करण्याच्या पद्धती यात सतत नूतनीकरण होत असल्याने या क्षेत्राच्या अभ्यासक्रमात व पुस्तकांत असलेले ज्ञान प्रत्यही कालबाह्य होत आहे. त्यामुळे इंटरनेट हेच ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम बनले आहे. संपर्कासाठी इमेल व संवादसुविधा पुरेशी ठरली तरी माहितीसाठी वेबसाईट हेच इंटरनेटचे महत्वाचे साधन आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीपने आपली पहिली वेबसाईट तयार केली. त्यावेळी ती तयार करण्यासाठी, सर्व्हरवर ठेवण्यासाठी व नंतर ती इतरांना (त्यावेळी फारच थोड्या लोकांकडे कॉम्प्युटर होते) त्यांच्या संगणकावर दाखविण्यासाठी किती प्रयास पडले याचा मोठा इतिहास आहे. साधे एचटीएमएल टॅग व रंगीबेरंगी जावा अप्लेटची तयार बटने वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे लोकांना त्यावेळी किती अप्रूप वाटले होते. व्हीएसएनएलच्या नेटवर्कमधील रूटरची कॅशे मेमरी फ्लश करण्यात विलंब लागत असल्याने वेबसाईटवरील बदलही सर्व ठिकाणी दिसण्यास वेळ लागत असे. सर्व जगभर ही वेबसाईट पाहता येते यावर लोकांचा विश्वास बसत नसे. आता ज्ञानदीपची सध्याची वेबसाईट खूपच वेगळी व आधुनिक आहे.

रोज नवनवे प्रयोग करून वेबसाईट अधिक चांगली व कार्यक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. त्या काळात शाळा कॉलेजच्या केलेल्या आमच्या सार्‍या वेबसाईट स्टॅटिक होत्या. फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर करून वालचंद कॉलेजच्या नकाशाचे मोड्यूल बनविले व कॉलेजच्या लायब्ररीतील सर्व पुस्तकांची यादी वालचंदसांगली (walchandsangli.org) या वेबसाईटवर पाहण्याची सोय अक्सेस डाटाबेसचा वापर करून केली. परंतु केवळ चमत्कृती व कुतुहल या भावनेतून त्याकडे पाहिले गेल्याने त्याचे महत्व लोकांना उमगले नाही. श्री लिपी डायनॅमिक फॉंट व डाटाबेसव एक़एमल यांचा वापर करून मराठी माध्यमातील संस्कृतदीपिका (sanskritdeepika.org) ही वेबसाईट बनविली तेव्हा तीही पुढे कालबाह्य ठरेल याची आम्हाला कल्पना आली नव्हती.

वेबसाईटच्या डिझाईन पद्धतीमध्ये नवनव्या सुधारणा होत होत्या. स्टाईल शीटचा वापर, व्हीबी स्क्रीप्ट वापरून (asp code) वेबसाईटचे सुटे भाग एकत्र जोडणे, अभिप्राय, इमेल व गेस्टबुकची सोय, फ्लॅश फोटोगॅलरी यामुळे ज्ञानदीपच्या वेबडिझाईन दर्जात बरीच सुधारणा झाली होती. तरीदेखील लोकांना या प्रभावी प्रसार व संपर्क माध्यमाची माहिती नसल्याने वेबसाईटकडे केवळ एखाद्या छापील जाहिरातीच्या दृष्टीने पाहिले गेल्याने कमी खर्चात कामचलावू वेबसाईट करण्याकडे लोकांचा ओढा होता. आजही ज्ञानदीपच्या अनेक जुन्या वेबसाईट त्याच जुन्या कालबाह्य स्वरुपात चालू आहेत. त्यांचे त्वरित आधुनिकीकरण करण्याची गरज ग्राहकांना पटवून देण्याचे अवघड काम ज्ञानदीपला आता करावे लागत आहे.

सुदैवाने नवनव्या आकर्षक डायनॅमिक वेबसाईट लोकांच्या पाहण्यात आल्याने, व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने, शासकीय स्तरावर इ गव्हर्नन्सचा वापर वाढल्याने व इंटरनेटचा स्पीड वाढल्याने परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मात्र वेबसाईट डिझाईन करणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाल्याने येथेही तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार याची ज्ञानदीपला कल्पना आहे. अनेक वर्षांचा अनुभव ही शिदोरी वेबडिझाईन क्षेत्रात पुरेशी नाही याची ज्ञानदीपला पुरेपूर जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून नवे तंत्रज्ञान शिकून वेबडिझाईनमध्ये कालानुरूप सतत बदल करण्याचे धोरण आम्ही अंमलात आणले आहे.अर्थात शिकलेले वेबडिझायनर नोकरी सोडून पुण्या-मुंबईकडे गेले की पुन्हा नव्या उमेदवारांच्या शिक्षण व संशोधनासाठी वेळ खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. आतापर्यंत असे १५ अनुभवी वेबडिझायनर ज्ञानदीपने इतर संस्थांना मिळवून दिले आहेत.

विषयाला अनुरूप आकर्षक रंगसंगती व मजकुराची मांडणी यावर वेबसाईटचे यश अवलंबून असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनला फार महत्व आहे.वेबसाईट सर्व ब्राऊजरमध्ये व्यवस्थित एकसारखी दिसावी यासाठी विषेश प्रयत्न करावे लागतात. w3c या संस्थेकडून वेबसाईटचे परिक्षण करून तिचे प्रमाणपत्र घेता येते.

डायनॅमिक मेनू, सरकत्या चित्रपट्ट्या, आकर्षक फोटो व व्हिडिओगॅलरी, साईटमॅप, टॅग क्लाऊड, विजेट, ट्विटर, फेसबुक, पिकासा इत्यादी (web 2.0) समूह संपर्क साधनांचा, गुगल मॅप, गुगल ऍड, मतपेटी, शॉपिंग कार्ट यासारख्या मोड्यूल्सचा समावेश अशा अनेक अपेक्षा आधुनिक वेबडिझाईनमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी वेब डिझाईनवर असते.सर्च इंजिन हे इंटरनेटवर माहिती शोधण्याचे मुख्य साधन आहे. त्याच्या शोधयादीत वेबसाईटचे स्थान वर येण्यासाठी सर्च इंजिन ऑफ्टिमायझेशन ही काळाची गरज बनली आहे.

याशिवाय वेबसाईटवर माहिती, चित्रे वा व्हिडिओ टाकण्याचे व रंगसंगती व मांडणी बदलण्याचे काम कोणतीही टेक्निकल माहिती नसणार्‍या वेबसाईट मालकाला करता यावी यासाठी ब्लॉग, वर्डप्रेस, जुमला, द्रुपल यासारख्या विविध वेबसाईट व्यवस्थापन प्रणाली विकसित झाल्या आहेत. डॉट नेट, कोड इग्नायटर, कोहाना, सिंफनी, पायरोसीएमएस यासारखे आकृतीबंधही (frameworks) अधिकाधिक वापरात येत आहेत. त्यातील योग्य पर्यायाची निवड करणेही आवश्यक असते. वेबसाईटवरील माहितीत उपर्‍या व्यक्तीने फेरफार करू नयेत यासाठी वेबसाईटला योग्य ती सुरक्षायंत्रणाही बसवावी लागते.

गेल्या काही वर्षांत ज्ञानदीपने पीएचपी, अजॅक्सचा वापर करून टेबललेस डिआयव्ही बेस्ड वेबसाईट तयार केल्या आहेत. जुमला, वर्डप्रेस व कोहाना मध्ये वेबसाईट तयार करून त्याचे व्यवस्थापन वेबसाईट मालकांकडे सुपूर्त केले आहे.बंगलोर महाराष्ट्र मंडळ, बंगलोर (mmbangalore.org.in) व लायन्स नॅब, मिरज(lneh.org) या संस्थांनी आपल्या बेबसाईट ज्ञानदीपकडून आधुनिक करून घेतल्या आहेत. उगारशुगर वर्क्सच्या वेबसाईटचे नूतनीकरण चालू आहे. इतरांनीही सध्याच्या काळातील वेबसाईटचे महत्व जाणून आपल्या आवश्यकतेनुसार वेबसाईटचे नूतनीकरण करून घ्यावे व आपल्या व्यवसाय वा उद्योगास आधुनिकतेची जोड द्यावयास हवी.

आता द्विमिती तंत्रज्ञानातून त्रिमिती तंत्रज्ञानाकडे व कॉम्प्यूटरकडून मोबाईलकडे वेबसाईटची वाटचाल चालू आहे. फ्लॅश/फ्लेक्स/ एक्शन्स्क्रीप्ट ३.० याचा वापर वाढला आहे. ज्ञानदीप या क्षेत्रातही आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या चालू असलेला परदेशातील बांधकाम क्षेत्रातील एक त्रिमिती प्रकल्प त्यादृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
 
Saturday, 28 April 2012

इंटरव्ह्यू देताना (भाग - 2

कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ?

सोनाली मांजरेकर :
तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं,कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ?

सोनाली मांजरेकर :
तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं, आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नासते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ?

सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो.

डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत.

शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ?

डॉमनिक कोस्टाबिर :
असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं.

नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ?

डॉमनिक कोस्टाबिर :
हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो.

सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल.

आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही.

सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं.

अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.
आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नासते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ?

सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो.

डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत.

शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ?

डॉमनिक कोस्टाबिर :
असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं.

नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ?

डॉमनिक कोस्टाबिर :
हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो.

सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल.

आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही.

सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं.

अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.

हडबडू गडबडू नका, धीर धरा (सुखी व्हा हसत-खेळत)

एखाद्या कामात अपयश आल्यास भीती वाटते व ताण निर्माण होतो. घाबरलेला माणूस ते कामच सोडून देतो. भीतीमुळे कार्य सोडणे चूक आहे. प्रबळ इच्छाशक्ती बाळगा आणि तेच काम पूर्ण करून टाका. यश नक्की मिळेल आणि पुढच्या वेळेला तुम्ही घाबरणार नाही.

जर तुमच्या मनावर ताण आला, तर मन शांत करून विश्रांती घ्या, आडवे व्हा आणि दीर्घ श्‍वास घेऊन विचार करा की, भीतीची किंवा रागावण्याची जरूर आहे काय? मन प्रसन्न ठेवल्यास सर्व प्रश्‍न सुलभपणे सुटतात. मनात खळबळ माजली असेल, तर शरीर सैल करून आडवे व्हा किंवा बसा. हे तंत्र वापरून तर पाहा. ज्यामुळे मनावर ताण येतो, त्याच्या विरुद्ध भावना मनात निर्माण करा.

समजा तुम्हाला इंजेक्‍शनची भीती वाटते. त्यामुळे तुमच्या मनावर ताण येतो. त्यावेळी विचार करा की, इंजेक्‍शन अगदी लहान बालकांनाही टोचतात. त्या बालकाला जर नंतर त्रास होत नाही, तर तुम्हालाही नंतर त्रास होणार नाही. न्यायालयात साक्ष देताना साक्षीदार घाबरतात. त्याच्या मनावर ताण असतो. त्यावेळी असा विचार करा की, येथे न्यायाधीश, वकील, पक्षकार इतकेच तर लोक आहेत. ही काही कोणी राक्षस नाहीत. आपल्यासारखीच माणसे आहेत. हे सर्व जण शिस्तीत वागणारे आहेत. मग तुम्ही साक्ष द्यायला घाबरायचं कशाला? अनेक उमेदवार मुलाखत देताना घाबरतात. त्यावेळी तुम्ही मनात आणा की, मुलाखत घेणारे आपल्यासारखे तर आहेत.

त्यांना शिंगंबिंगं नाहीत. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. ज्यांना तुम्ही भयंकर व भीतिदायक खुनी समजता, तेसुद्धा खरोखर तुम्ही समजताइतके वाईट नसतात. तुमच्या मनातील कल्पनेमुळे तुम्ही त्यांना घाबरत असता.

काही कामे करावी तर लागतातच; पण त्या कामात अपघाताची व अनिष्ट होण्याची भीती असते किंवा अपयशाची भीती वाटते. त्यावेळी तुम्ही असा विचार करा की, अजून तर अपघात किंवा संकट आलेले नाही ना? येईल तेव्हा त्याचा सामना कसा करायचा, याचा विचार करू. पुलापाशी पोहोचल्यानंतर

लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

परवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्षे आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो.
काकूंना म्हणालो की ‘मी आधी घराच्या कर्जासाठी एचडीएफसी बँकेत चौकशी केली होती. आणि त्यांनी मला सहा लाखच कर्ज देखील मंजूर केल होत. त्यांनी सगळा हिशेब करून मला वीस वर्षांसाठी ६३०० रुपयांचा हप्त्याने फेडण्याचे सांगितले होते. मलाही खूप आनंद झाला होता. पण घरी येऊन मी जेव्हा हप्ता आणि महिने याचं गणित केल त्यावेळी लक्षात आल की बँक मला सहा लाखच कर्ज देणार आणि माझ्याकडून हप्त्याने पंधरा लाख बारा हजार रुपये घेणार. एकूणच व्यवहार तोट्यात असल्याने मी कर्ज घेण्याचा निर्णय स्थगित केला.’ त्या म्हणाल्या ‘बरोबर आहे. म्हणजे ती च्या भावाकडून देखील दुप्पटीपेक्षा अधिक घेणार.’ काकुनी मला विचारलं ‘मग तू घरासाठी पैसे कसे जमा केले?’
मी त्यांना सांगितले की आई – वडिलांनी मदत केली. आणि बाकी उरलेल्या रकमेसाठी मी कर्ज घेतलं. खर सांगायचं झाल तर कर्ज घेण टाळावं. म्हणजे मी तरी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा संगणक घेताना आणि माझा मोबाईल घेण्यासाठी मी प्रथम पैसे जमा केले होते. आणि नंतर वस्तू घेतली. कारण एकदा का कर्ज घेतलं की आपण बंधनात अडकून पडतो. एक तर रुपयाची वस्तू अडीच रुपयाला विकत घेतो. आणि हप्त्याच्या चिंतेपायी नवीन काही खरेदी करण्याचे टाळतो. म्हणजे सद्याला माझ अस झाल आहे की मोठी काही खरेदी म्हटलं की माझ्या डोकेदुखीचा विषय बनून जातो. त्यात माझ्या घराचे माझ्या लग्नाचा घाट घालून बसले आहेत. बहुतेक पुढच्या वर्षीच्या मे महिन्यानंतर मला एखादी मुलगी पसंत करावीच लागेल. माझी सद्याची मिळकत बघता, दोघांचा खर्च आणि कर्जाचा हप्ता सहजपणे निघेल. पण बचत नावाचा काही प्रकार घडण्याची शक्यता फारच कमी वाटते. कारण मी ‘ती’च्या बहिणीला सोडून इतर जेवढ्या मुली बघितल्या आहेत त्यांच्या बद्दल एकाच शब्द वापरावा वाटतो ‘उधळ्या’. आता मला एखादी अशी भेटली की माझ सगळ दिवाळ निघायला फार काही वेळ लागणार नाही. काकू म्हणाल्या ‘आता घर खर्च कसा भागवतो?’ काकूंना सांगितलं ‘आई आहे. पण ती खर्च फ़क़्त खाण्या पिण्यावर करते. बाकी फालतू खर्च नाहीत. उलट ती असल्याने माझा बाहेरचा जेवणाचा खर्च वाचतो.’ एकूण काय काकूंना एवढ तर कळलं की माझ सध्याला सोसो चालू आहे. माझ्या मित्राने मध्यंतरी सांगितलेला किस्सा. त्याच्या एका मित्राने दोन वर्षात पन्नास एक हजारांचा बँक ब्यालंस करून ठेवला होता. पण लग्नानंतर एका वर्षातच तो संपला. जाऊ द्या, नाही तरी खर्च कोणत्या न कोणत्या मार्गाने जाताच असतो. मध्यंतरी मी दोन बुटाचे जोड घेतले. तीन चार महिन्यांपूर्वी नवीन गैस कनेक्शन घेतले. नाही म्हणता म्हणता महिन्यात किमान पाच एक हजार रुपयांचा असा खर्च होतोच.
आता उद्या कर्जाचा हप्ता भरावा लागेल. ह्या बँक पण न काहीना काही निमित्त काढून सुट्ट्या घेतात. आणि इथ माझी गोची होऊन बसते. आता ह्यांच्या सुट्ट्या आणि माझ पेमेंट एकाच वेळेस का होत हेच कळत नाही. मागील महिन्यात सुट्ट्या नव्हत्या पण काहीतरी बँकने घोळ घातला मग पेमेंट जमा व्हायला उशीर झाला. मग काय माझ्या लहान भावाकडून उसने पैसे घ्यावे लागले. आता ताबडतोप दोन दिवसात परत केले ती वेगळी गोष्ट पण अशी वेळ नेहमी येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो. पण काही खर्चाच गणित काही बसत नाही. यावेळी सुट्ट्यांचे नवे नाटक. कर्ज काढल्यापासून हे दर महिन्याच्या सुरवातीला चिंता सुरु आहे.

कत्तलीची रात्र

कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना एका मतासाठी पन्नास रुपये दिले जायचे. आता हा आकडा निवडणूक आणि तो उमेदवार यावरून कमी जास्त व्हायचा. आता १९९५ साली पन्नास रुपये आकडा खूप मोठा होता. काही पक्षाचे लोक दारू, कोणाला घरासाठी पैसा, जमीन, काहीना कपडे तर काहींना घरांसाठी सिमेंट आणि काहीना रेशनकार्ड अस बरंच काही द्यायचे. आता मत मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला झोपडपट्टीत हे वाटावेच लागतात. हे मी माझ्या मनाच किंवा कुठल्या वर्तमानपत्रात वाचून सांगत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टी घडतात.
आपण जे आघाड्या किंवा युत्या म्हणतो या सगळ्याच पक्षांना अस करावच लागत. मागील विधानसभेच्या वेळी आमच्या गल्लीत देखील हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. आणि हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिले आहे. आमच्या गल्लीत प्रत्येक व्यक्ती किमान बारावी पास आहेत. आमची गल्ली सुशिक्षित समजली जाते. पण तिथेही हा प्रकार सुरु झाला आहे. आता उद्या जेव्हा मी मतदानाला जाईल त्यावेळी कळेलच कोणी कोणी पैसे घेतले आहेत. मागील विधानसभेच्या वेळी आमच्या गल्लीतील काही जेष्ठ आणि वयाने मोठ्या असणाऱ्या आजोबा लोकांनी गल्लीतील मंदिरासाठी निधी घेऊन त्याच्या बदल्यात गल्लीतील सगळ्या नागरिकांनी निधी देणाऱ्या उमेदवाराला मत द्यावे असा प्रस्ताव मांडला होता. आता त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना झापल्यावर पुढे तो प्रस्ताव बारगळला. पण असं आमच्या गल्लीत झालं होत. बर कोणीही त्यातील गरीब किंवा फार गरजू अस नाही. किंवा कोणी अशिक्षित नाहीत. यातील बरेच शाळेत किंवा सरकारी खात्यात खूप मोठ्या हुद्द्यावर होते आणि काही आहेत. आमच्या गल्लीत फार काही जास्त नाही पण पन्नास जणांना मतदानाचा अधिकार आहे.
आता आपण स्पष्टच बोलूयात. मागील लोकसभेच्या वेळी निवडणुकीत पन्नासपैकी पाच जणांनी मतदानच केल नाही. उरलेल्यापैकी चौदा जणांनी पैसे घेवून मतदान केले. आणि बाकीच्यांचे आपले खरे मतदान. शेजारची संपूर्ण गल्ली पैसे घेऊन मतदान करते. त्या गल्लीत किमान तीनशे मतदार आहेत. आता नुसता दोन गल्लीचा हिशेब लावला तर त्यातील ३१ जणांनी केलेले खरे मतदान. आता शहरी भागात जरी दिसत नसले तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात होते. आता घरी येताना आमच्या येथील गणेश मंदिरात काही मुले निवडणूक केंद्र आणि वेळेची पत्रके घेऊन हिशेब लावीत होती. त्यांच्याकडे दहा बारा मोठ्या पिशव्या होत्या. ते बघूनच मी इथेही कत्तलीची रात्र होणार हे मी समजून गेलो होतो. आमच्या भागात रेल्वे स्टेशनपासून ते आमच्या बिजलीनगरपर्यंत खूप मोठी झोपडपट्टी आहे. किमान पाच एक हजार सहज मतदार असतील. अजून चिंचवड गावातील चाफेकर चौकात असलेली झोपडपट्टी वेगळीच आहे. पुण्यात तर काही विचारूच नका, निम्मे मतदार झोपडपट्टीतले. ह्या कत्तलीच्या रात्री काही दारू पितात, तर काही आपआपल्या सोसायट्यांना उमेदवारांकडून रंगरंगोटीची कामे करून घेतात. तर काही आपली अनधिकृत बांधकामाला अधिकृत करून घेतात. आता हे मी बघितलंय म्हणून बोलत आहे.
बंर अस करून देखील कोणताही फालतू उमेदवार कसा काय निवडून येतो म्हटलं तर त्याला आपणच जबाबदार आहोत. आमच्या कंपनीत मी, माझा एक मित्र आणि कदाचित माझा बॉस सोडून कोणीही मतदानाला जात नाहीत. त्यांचे कधी पेमेंट स्लीप बघा. आता माझा मित्र बोपोडीत राहतो. त्यांच्या अख्ख्या मतदार संघात हेच चालत. यावेळी बहुतेक त्यांच्याकडे हजार रुपये मत अशी कत्तल चालू आहे. आता ह्या विषयावर कंपनीत बोलल्यावर जे कधीच मतदान करत नाहीत. त्यांना पैसे घेऊन मतदान करण चुकीच वाटल. पण त्याचा काय उपयोग. ते म्हणतात न ‘दुसऱ्याला सांगे ब्रम्हज्ञान स्वत कोरडे पाषाण’ तशातली ही गत आहे. माझ्या चार मित्र आणि त्यांचे घरचे मिळून जवळपास अठरा मतदार आहेत. त्यातले दहा मतदार यावेळी मतदान करतील. ह्याच्यात मी कंपनीतील कोणातच आकडा टाकलेला नाही. साधं सोप गणित आहे. एकूण मतदारातील पन्नास टक्के मतदानच करत नाही. उरलेल्या मतदारांपैकी निम्मे पैसे घेऊन मतदान करतात. आणि उरलेले तुमच्या माझ्यासारखे मग का नाही फालतू उमेदवार निवडून येणार. आणि आपण दिलेली घरपट्टी, पाणीपट्टी, प्रोफेशनल ट्याक्स, इन्कम ट्याक्स अजून काही असतील ते ट्याक्स खाणार. आणि चांगले पक्ष आणि उमेदवार पडणार. हीच कत्तलीची रात्र अनेक उमेदवारांचे भाग्य ठरवते. मतदान हे फ़क़्त नाटक बनून राहते. म्हणजे मी तरी नेहमी मतदान करतोच. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी मुंबईहून आणि या लोकसभेला पुण्याहून पैसे खर्च करून मतदानाला नगरला गेलो होतो. आणि याही वेळी जाणार आहे.

हिंदू अतिरेकी

आज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’.
बघा साध आणि सोप गणित आहे. तराजू स्थिर तेव्हा राहतो ज्यावेळी दोन्ही बाजूला सारख माप असत. जर तुम्ही मशिदीच्या स्पीकरचा खर्च देशात जमा झालेल्या करामधून देणार असेल तर मंदिरावर देखील स्पीकर तुम्ही बसून द्यायला हवा. आमच्या घरात मी आणि माझा लहान भाऊ. वडील कोणतीही गोष्ट आणताना सम समान आणायचे. त्यामुळे माझा आणि त्याच कधी याविषयावरून भांडण होत नसायचं. का होईल? आता दोघांनाही सारख भेटल्यावर कशाला उगाचच मी किंवा तो वाद घालेल. गोधरामध्ये अख्खा रेल्वे डबा जाळून टाकला. त्यातल्या लहान बाळाचं एक फोटो बघून माझ्याही डोळ्यात पाणी आल होत. आता त्यालाते सगळ्यांचेच कोळसे झाले होते. मग मीच काय कोणीही ते बघून त्याच रक्त खवळेल. बर त्यावेळी देशाची मान खाली गेली होती ना जगासमोर? त्यापुढे दंगल झाली. त्यात मुस्लिमांना मार खावा लागला. अनेकांना जाळून मारलं. मग काय चुकीच केल? तुम्ही आमच्या पोर बाळांचा कोळसा करणार आणि आम्ही संयम पाळायचा? तुमचे लोक मुला बाळांना जाळून मुंबईची भेलपुरी खाणार आणि आम्ही फ़क़्त रडायचं.
आता आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला रडायचं शिकवलं नाही. ते स्वत कधीही शत्रू समोर टीप गाळात बसले नाहीत. अफझल खान असो की शाहीस्त्य खान. कोणी नाही सोडला महाराजांनी. अफझल खानच्या वेळी महाराजांनी जर त्यावेळी आयोग नेमून शिफारसी केल्या असत्या, किंवा हायकमांडला निर्णय घ्या अस म्हटलं असत तर गोष्ट वेगळी असती. किंवा हे कृत्य घडल्यावर त्यांनी निषेध नोंदवला असता तर आम्हीही त्याच पद्धतीने केल असत. पण नाही ना तसं काही घडल. आता तुम्ही आमच्या मिरवणुकीवर वाद्ये वाजवता म्हणून दगडफेक करायची. आणि पोलिसांनी आमच्यावर शांतता भंग करतात म्हणून केसेस टाकायच्या. बर तुमचा गुरु म्हटला की फाशीला रांग. आमच्या राक्षसंंच्या चित्रांची स्पर्धा तुम्ही भरावयाची. बर पण आम्ही नाही हं काही बोलायचं. पाटलीण बाई जगभर फिरून येणार आणि आम्हाला स्वातंत्र्य दिनाला दिव्य संदेश देणार की आतांवाद्याला धर्म नसतो. बाईना सही करताच येत नाही बहुतेक. आमच्या मुंबईत जनाब कसाब चौथी नापास मुंबई दर्शन घ्यायला येणार. आल्यावर जनाब कोणावरही गोळ्या झाडणार. बर जिथे जनाब उतरले होते त्याच ताज हॉटेल समोर गेट वे इंडियाला त्याच वेळेस मी माझ्या मित्रांसोबत फेरफटका मारत असायचो. तिथ असलेल्या डी.एन. रोडवर माझ्या याआधीच्या कंपनीची इमारत होती. पुण्यातल्या एका जणाला मुंबईत त्याच दिवशी नवीन जॉब लागला होता. तो आनंदात त्याचे ऑफर लेटर घेऊन पुण्याला येण्यासाठी सीएसटी आला. तिथे जनाब कसाब होतेच. त्याला गोळ्या दिल्या. काय सांगायचं त्याच्या आईला? की कसाब सॉरी जनाब आमच्या तुमच्या पैशाची बिर्याणी खातो आहे.
बर पण कोणीही चुकून त्याला किंवा गुरूला इस्लामी आतंकवादी म्हणणार नाही. कारण आपला देश निधर्मी ना. मग धर्मच नाव काढायचं नाही. आणि हो हे सगळ घडत असत तरी तुम्ही आम्हाला शांत राहा अस दटवायाच. तुम्ही दोन पोलिसांना ठेचून मारायचं. तिथे पोलीस ठाणे उभे राहून द्यायचं नाही. पण आम्ही शांत राहायचं. उद्या कधी जगात कुठेही काही घडल तर तुम्ही आमची घरे दुकाने जाळायची. आमच्या बहिणींना उचलून न्यायचे. पण तेव्हाही आम्ही शांत राहायचे. मग तो झाला तुमचा निषेध. बर हे सगळ विसरायला आम्ही तयार आहोत. पण शिवाजी महराजांनी अफझलचा कोथळा कसा विसरायचा. मग तुम्ही आमच्या बहिणीला विष पाजायचे. एकाला भोसाकायाचे. मूर्त्या तोडायच्या.पण आम्ही चिडलो की आहेच पोलीस. ह्या पोलिसी कुत्र्याला आमचाच लचका तोडता येतो. कारण आता पर्यंत आम्ही शांत राहत आलो. तिकड भिवंडीत किंवा मालेगावात नाही काही करता येत ह्या कुत्र्याला. शेपूट घालतो ना. बर आमच्यातील कोणी काही फुसका बॉम्ब देखील उडवला की ‘हिंदू अतिरेकी’. मग कुठे जात निधर्मीवाद कोणास ठाऊक?

स्वतःवर ताबा

स्वतःवर ताबा ठेवणे, कदाचित जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे, सकाळी साखर झोपेतून उठतांना ते रात्री विचार चक्रे थांबवून शांत झोपण्यापर्यंत स्वतःवर ताबा ठेवण्याची कसरत करणे फारच जिकीरीचे काम असते. कदाचित, काही गोष्टीत स्वतःवर ताबा ठेवणे काहींना सहज शक्य असेल. पण, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा असून देखील एखाद्या विशिष्ट कारणामुळे ती गोष्ट न करण्याचे बंधन घालणे खुपच कठीण असते. आता फक्त स्वतःवर बंधन घालणे, याचाच अर्थ स्वतःवर ताबा असणे असा नव्हे.
शाळेत जाणाऱ्या एखाद्या मुलाला जेवढा अभ्यासाचा कंटाळा येतो तेवढाच कंटाळा विकेंडच्या दिवशी ‘काम’ करणाऱ्या एखाद्या कामगाराचा असतो. खर तर ‘कंटाळा’ हा एक वेगळा विषय आहे. अगदी साधे उदाहरण, वाहन चालवतांना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे. हेही फार अवघड. एखादा वाहन ‘वीर/वीरांगना’ भुर्रकन कट देवून अथवा कुत्सित नजरेने पुढे जाते. त्यावेळी, स्वाभाविक घडणारी प्रतिक्रियेवर ताबा ठेवणे तेवढेच कठीण असते. वाहनाचा वेग वाढवण्याचा अथवा वेगात वाहन चालवण्याचा मोह आवरणे. हे देखील स्वतःवर ताबा असण्याचे एक लक्षण आहे.
आता स्वतःवर ताबा ठेवण्याचा काय फायदा? या प्रश्नाचे उत्तर ताबा ठेवण्यानंतरच कळू शकते. एखाद्या न पटणाऱ्या मुद्यावर. किंवा एखादा न पटलेला विषयाकडे पाहून वाढणारा अथवा येणारा राग. आणि त्यावेळी स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी लागणारी मेहनत फारच अवघड असते. एखादी न पटणारी गोष्ट दुर्लक्ष करणे. ही देखील एक खूप मोठी कला आहे. स्वतः शांत राहणे. अथवा कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा तोल ढळू न देणे. हे स्वतःवर ताबा असल्याचे लक्षण आहे. परंतु याचा अर्थ, एका गालात चापट खाल्ल्यावर दुसरा गाल पुढे करणे. किंवा स्वस्थ बसणे असा नव्हे. अन्याय सहन करणे याचा अर्थ स्वतःवर ताबा आहे असा देखील मुळीच नव्हे.
स्वतःवर ताबा ठेवल्याने कदाचित वेगात वाहन चालवण्याची मजा मिळणार नाही. परंतु, वाचणारे पेट्रोल आणि त्याहून पुढे जावून वेगाच्या भरात घडण्याची शक्यता असलेला अपघात निश्चितच टळू शकतो. न आवडणारे विषय किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीं विषयी किंवा त्यांच्या वागण्याविषयी स्वाभाविक उमटणारी ‘प्रतिक्रिया’ देण्याची पद्धतीवर ताबा ठेवल्यास भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होवू शकतो.
हेही तितकेच खरे की, स्वतःवर ताबा ठेवणे अथवा नियंत्रण ठेवणे, बोलण्या इतके किंवा फुकाचे सल्ले देण्याएवढे सोपे नक्कीच नाही. काहींना कदाचित काही विषयात स्वतःवर ताबा मिळवणे शक्य झाले असेल. परंतु, स्वतःवर संपूर्ण ताबा मिळवणे हे हिमालयात तपश्चर्या करण्या इतकेच कठीण काम आहे.