Sunday, 13 May 2012
मटाबाबा डॉट कॉम
ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा ऐकल्यावर. देशीबाबा च्या रांगेत नेऊन बसवलं होतं त्याने मटाला.
आजकाल ह्या वर्तमान पत्रांची पातळी इतकी खालावली आहे की सगळ्यांसमोर हा पेपर नेट वर उघडून वाचणे पण कठीण झाले आहे . एके काळी गोविंदराव तळवलकर, कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, पुलं देशपांडे सारख्या मातब्बर लेखकांच्या लेखांनी नटलेला दर्जेदार पेपर होता मटा. आज त्याची जी विपन्नावस्था झालेली आहे , ती बघून वाईट वाटते. पेपरची अशी दुर्दशा होण्याचे कारण काय ते काही समजत नाही. चांगले लेखक नाहीत? की अजून दुसरं काही??
टीआरपी साठी ज्या प्रमाणे इंडिया टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात , त्याच प्रमाणे पेपर मधे पण टीआरपी साठी काय वाटेल ते छापण्याची पद्धत सुरु झाली आहे. यलो जर्नॅलिझम म्हंटलं तरी हरकत नाही याला. सेक्स, नग्न स्त्रिया, असं काहीतरी छापलं की लोकं धावत येतात पहायला. पेज हिट्स वाढले की झाले. चांगलं लिहून पेज हिट्स वाढवण्यापेक्षा हे सोपं अहे.बस्स!!
ऑन लाइन पेपर उघडल्यावर पेपर वाचता वाचता पेपरवर असलेल्या बऱ्याच लिंक्स पैकी एखाद्या लिंक वर क्लिक केल्यावर जर डोळ्यासमोर एकदम नग्न स्त्री चा फोटो आला, आणि तेवढ्यात शेजारी कोणी आलं तर तुम्ही काय कराल? एकदा मी लंच टाइम मधे मटा वाचत होतो, बहुतेक कुठेतरी क्लिक झाले असावे, आणि समोर एकदम एक स्त्रीचा अर्धनग्न फोटो आला. शेजारच्या क्युबिकल मधल्याने पाहिले तर नाही? म्हणून एकदम मागे वळून पाहिले. कसं तरी करून पेपर चे ते पेज बंद केले. तो पेपर होता अर्थात मटाबाबा. तो फोटो जेंव्हा एकदम समोर आला तेंव्हा बसलेल्या धक्क्यातून मी लवकर सावरू शकलो नाही.
एखाद्या विवाहित स्त्रीने योनी शुचिता सांभाळावी अशी अपेक्षा असते. वेश्ये मधे आणि घरंदाज स्त्री मधे फक्त तेवढाच फरक असतो. त्याच प्रमाणे पेपरने पण एक स्टॅंडर्ड मेंटेन करावं अशी अपेक्षा असते. काय छापावे काय छापू नये यावर स्वतःचे स्वतःच नियंत्रण ठेवायला हवे . नाहीतर मस्तरामच्या पुस्तका मधे आणि पेपर मधे काय फरक शिल्लक राहील? पेपरवर हल्ली सेन्सॉरशिप नाही. पण आजकाल पेपर वाल्यांनी जर सामाजिक बांधिलकीची जाणीव सोडून, कंबरेचे गुंडाळून डोक्याला बांधलेले पाहिले की मग मात्र सेन्सॉरशिपची खरंच आवश्यकता आहे असे वाटायला लागते.
महाराष्ट्र टाइम्स बद्दल एकेकाळी एकप्रकारचा आदर होता. मी लहान असतांना नागपूरला मटा दुसऱ्या दिवशी मिळायचा, तरीही आमच्या घरी घेतला जायचा कारण उच्च दर्जाचे लेख. उशीरा मिळाले तरी पण वडिलांना खूप आवडायचा. तसं म्हटलं तर मटाचं आणि माझं वय एकच! अगदी लहानपणापासून हा पेपर मी बघत आलो आहे. अगदी लहान असतांना पासून आयफल टॉवर वाचायला आवडायचे. एकेकाळच्या इतक्या चांगल्या पेपरची सध्या जी दयनीय अवस्था झालेली आहे ती पाहून वाईट वाटतं. वाचक मिळावे म्हणून चांगले वैचारिक लेख लिहण्यापेक्षा चक्क पोर्नोग्राफी आधार घ्यावा लागतो या पेपरला, ही कल्पनाच सहन होत नाही.
पेपर हा घरातल्या सगळ्यांनी वाचायचा असतो. घरच्या कॉम्प्युटर वर मराठी पेपर वाचणारी मुलं आहेत. मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. काय छापावं- आणि काय नाही ,नग्नता किती प्रमाणात दाखवावी,याचा विधिनिषेध न बाळगता, चीप, व्हल्गर, आणि सेक्स ने परिपूर्ण असलेले काही फोटो तरी पेज हिट्स वाढवायला छापायचे – असे प्रकार मटा ने सुरु केलेले आहेत.
२१ तारखेच्या मटा मधे सिलेब्रेशनच्या नावाखाली जे काही फोटो मटा ने दिलेले आहेत ते सगळ्यांसमोर पहाण्याच्या लायकीचे नाहीत. फोटोमधे काय दाखवले आहे हे सुद्धा इथे लिहीण्याची मला लाज वाटते, त्या साठी ही लिंक पहा. असे फोटो छापण्यासाठी निर्लज्ज पणा लागतो . इतका निर्लज्ज पणा अंगी मुरवायला पण खरंच गेंड्याची कातडी लागते, वर सिलेब्रे्शन मधे दिलेल्या फोटो मुळेच हा लेख लिहायला घेतला. माझ्या तर्फे नो कॉमेंट्स!!
एका लेडी कॉन्स्टेबलच्या पार्श्वभागाचे छायाचित्र या पेपरने वेब मसाला मधे छापले होते.
बरं हे झालं ते फोटो बद्दल. मटा वरचे लेख आजकाल कसे असतात हे सांगायची गरज नाही. अशुद्ध भाषा, जागोजागी इंग्रजी शब्दांचा केलेला विनाकारण वापर, वगैरे वगैरे.. शुद्धलेखन कशाला म्हणतात हे बहुतेक विसरले असावे मटा वाले. मुद्रितशोधन पण केले जाते की नाही याची पण मला शंकाच आहे .
भाषा इतकी अशुद्ध / चुकीची वापरलेली असते, की वाचतांना भातामधे खडे लागावे तसे ते शब्द वाचून अडखळायला होतं . थोडी फार चूक एखाद्या ब्लॉगरची झाली तर समजल्या जाऊ शकते, पण चक्क राष्ट्रीय दर्जाच्या पेपर मधे पण चुका अजिबात क्षम्य नाहीत.
चांगले लेख न लिहिणे, चांगली भाषा “ न वापरणे “ , सेक्सी चित्र देणं, झणझणीत वेब मसाला म्हणून पोर्नोग्राफी च्याही थोबाडीत मारेल असे फोटो लेख, फोटो छापणं, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि आम्ही असेच करणार, हे यांचे ( मटाचे) ब्रिद आहे की काय असा संशय येतोय हल्ली.
आमची निवड मधे( लिंक इथे आहे) हे लोकं अक्षरशः सिंगल/डबल एक्स रेटींगचे फोटो देतात. आणि वर शीर्षक काय तर म्हणे “आमची निवड’- वाह! क्या बात है.कपाळावर हात मारून घ्यावासा वाटतो. पेपर हा १३ वर्षाचा मुलगा ते ८० वर्षाचे आजोबा कोणीही वाचतो-. त्या मुळे जे काही असेल ते सगळ्यांना पहाता येण्यासारखे, वाचता येण्यासारखे असावे असे वाटते. ज्याला पोर्नोग्राफी पहायची आहे त्यांच्यासाठी अनेक साईट्स आहेत नेट वर.
काही दिवसा पूर्वी हेरंब ओक ने एक बझ सुरु केला होता. त्यावर दररोजच्या मटा मधल्या चुका लिहिल्या जात होत्या. त्या चुकांच्या बद्दल इथे लिहायला जागा पण पुरणार नाही, म्हणून इथे त्या बझची लिंक देतो आहे. हा बझ नक्की पहा . बझ पहाण्यासाठी तुम्हाला फक्त जी मेल वर लॉग इन करावे लागेल, आणि नंतर मग लिंक उघडेल. एखाद्या राष्ट्रिय पातळीवरच्या एखाद्या वृत्तपत्राला स्वतःच्या लिखाणाच्या क्वॉलिटी बद्दल काही खात्री नसल्याने पेज हिट्स साठी अशा प्रकारचे फोटॊ पोस्ट करावे लागत असावे, या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असेल ?
नेट वरच्या सकाळ मधे आलेल्या लेखावरच्या कॉमेंट्स लेखकाचा पुरेपूर अपमान करणाऱ्या असतात. कॉमेंट्स साठी पण मॉडरेशन आहे, तरीही मुद्दाम मॉडरेट करुन लेखकाचा अपमान करणाऱ्या कॉमेंट्स पब्लिश करण्यामधे सकाळचा कोणीच हात धरू शकत नाही.
मी मान्य करतो, की त्या कॉमेंट्स बरेचदा लेखापेक्षा पण जास्त करमणूक करतात. मला पण वाचायला आवडतात. पण एखाद्याने आपला लेख सकाळ कडे छापायला पाठवला की त्याचा अर्थ हा नाही की लेखकाने सकाळच्या साईट वर स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी लेख छापण्यासाठी सकाळला परवानगी दिलेली आहे.
आजकाल तर सकाळच्या प्रत्येकच पानावर ऍड्स लावलेल्या आहेत. कुठेही क्लिक केले की बाजूला जाहिरात उघडते. पैसे कमावण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाण्याची खरंच काही गरज नाही.प्राजक्ता पटवर्धनची एक सुंदर कविता पण या सकाळने सोडली नाही. त्यावर पण एकफालतू कॉमेंट दिलीच. अशा कॉमेंट्स साठी सोशल साईट्स आहेत. सकाळने ती कॉमेंट पब्लिश केली नसती तरीही चालले असते.पण कॉंट्रोव्हर्सी सुरु करून पेज हिट्स वाढवणे हा मुख्य उद्देश असतो.
मुक्तपीठ हे तर सर्वसामान्य लोकांचे लेख छापण्यासाठी सुरु केले होते. पण हल्ली काय होतं मुक्तपीठ?? मुपी वर लेख लिहिणारे सर्वसामान्य लोकं असतात, कधी पेपर मधे नांव वगैरे छापून न आलेले- आणि लिहिण्याची सवय नसलेले, नॉन प्रोफेशनल रायटर्स. एखाद्या वेळेस पेपर मधे नांव आलं, की उगाच आनंद होतो. आपण खूप काही मिळवलं असं वाटतं. एखादा लेख आला की ताबडतोब त्या लेखावर कॉमेंट्स चा मारा सुरु होतो.लेखकाने जर पुन्हा येऊन कॉमेंट्स पाहिल्या , तर त्याला इतकं वाईट वाटावं की आपण झक मारली आणि सकाळला लेख छापायची परवानगी दिली.मुक्तपीठ हे नवोदिताना संधी देण्यासाठी नाही तर त्यांचा अपमान करण्यासाठी सुरु केले आहे का हा प्रश्न नेहेमीच पडतो मला!
इतरही पेपर मधे अशा प्रकारचे लेख असतातच, पण त्यावर अशा सकाळ प्रमाणे अपमान करणाऱ्या कॉमेंट्स पब्लिश करून लेखकाचा अपमान केला जात नाही.
हे असे चीप प्रकार सकाळ मधे नेहेमीच सुरु असतात. लेखकाची हुर्यो उडवा, अपमान करा, कशाही कॉमेंट्स पब्लिश करा,म्हणजे लोकं पुन्हा पुन्हा त्या कॉमेंट्स वाचायला येतात . सकाळचा संपादकीय विभाग पण मुद्दाम अशा कॉमेंट्स अप्रुव्ह करतो यावरून त्यांची पेज हिट्स वाढवायची ही स्ट्रॅटेजी आहे हे लक्षात येते. कॉमेंट मॉडरेशन एनेबल केलेले आहे, प्रत्येक कॉमेंट नीट तपासून मग नंतरच प्रसिद्ध केली जाते. मला वाटत की कॉमॆंट लेखकाची अपमान करणारी असेल तरच फक्त प्रसिद्ध केली जावी असा नियम आहे .सगळा संपादकीय विभागच या अशा खेळात मग्न आहे. टी आर पी , पेज हीट्स वाढवण्यासाठी अगदी मुख्य बातम्यांवर पण अशाच चीप कॉमेंट्स प्रसिद्ध केल्या जातात.
सकाळची ही मनोवृत्ती बदलली पाहिजे नाहीतर एक चीप थर्ड रेट पेपर पेक्षा जास्त काही किम्मत रहाणार नाही या पेपरला – कमीत कमी माझ्या नजरेत तरी.

’मटाबाबा डॉट कॉम’ चा पुन्हा लवकरच ’मटा, पत्र नव्हे मित्र ’व्हावा या अपेक्षेत असलेला एक मटा वाचक………सकाळ पण काही या बाबतीत मागे नाही. तुम्हाला स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे का? मग सकाळमधे लेख लिहा.

कपड्यात काय आहे??
पवाचीच गोष्ट आहे, सकाळी ऑफिसला निघायचं म्हणुन तयार होऊन बुट घालत होतो. तर तेवढ्यात आमचं धाकटं कन्यारत्नाने ( वय वर्ष १५) एकदम हसणं सुरु केलं..
म्हंटलं काय झालं?
तर म्हणे की तुम्ही अगदी वॉचमन सारखे दिसताय आज.. अगदी तस्साच ड्रेस घातलाय तुम्ही.

मी एकदा स्वतःकडे , अन स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं.काळा रंग माझा आवडता -स्पेशली ट्राउझर साठी म्हणुन काळी ऍरोची ट्राउझर, स्काय ब्लू लाइअनिंगचा ऍरोचाच शर्ट, नेव्ही ब्लु कंपनी लोगो असलेला टाय (कस्टमर सेमिनार होतं म्हणुन, नाही तर मी टाय वगैरे वापरत नाही , नेहेमी सेमी फॉर्मल म्हणजे फुल स्लिव्ह शर्ट ट्राउझर्स मधे असतो.) लावलेला होता. आरशा समोर जाउन उभा राहिलो.. आणी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं.. तर समोर एक अर्धवट वयाचा पोट सुटलेला , ज्याने केवळ कंबरेला पट़्टा लावला आहे, म्हणुन पोट जागेवर आहे, नाहीतर कधीच खाली घरंगळलं असतं.. असा एक माणुस दिसला. पण वॉचमन?? छे!!!
एकदम लक्षात आलं, की हल्ली वॉचमन लोकांचा पण असाच ड्रेस असतो. स्पेशिअली मल्टीप्लेक्स , मॉल्स मधे.. स्ट्राइप्स असलेला शर्ट, आणि काळी किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर… ते लक्षात आलं आणि एकदम हसु आलं. टाय काढुन टाकला, अन कपाटाशी गेलो, तिथे जाउन दुसरा शर्ट घालायचा म्हणुन प्लेन आकाशी रंगाचा शर्ट काढला.
तर मागुन कॉमेंट ऐकु आली.. ’बाबा, कोरियर बॉय चा ड्रेस होतोय ’ हा शर्ट नका घालू..
तिच्याकडे जरा चिडुनच पाहिलं.. तुला काय करायचय? मी काही पण घालीन..
असं म्हंटलं खरं, पण एकदा तिने कॉमेंट टाकल्यावर मात्र तो शर्ट घालायची इच्छा झाली नाही. कपाटाशी उभा राहुन बरेच कपडे उलथा पालथ करुन शेवटी एक पांढरा शर्ट, नविनच घेतलेला (सेल मधे .. लुई फिलीप वर सध्या ५० टक्के डिस्काउंट आहे ) तो घालायला म्हणुन बाहेर काढला, आणि कन्यारत्नाकडे ’आता काय म्हणशील?? ” अशा नजरेने पाहिलं.
ती काहीच बोलली नाही, फक्त थोडं हसली… मला बरं वाटलं… चला बरं झालं!
पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं, मला वाटतं की मी शर्ट घालायची वाट पहात ती उभी होती . जेंव्हा शर्ट घालुन झाला, आणि जोव्हान वगैरे अंगावर उडवुन झाल्यावर टाय लावायला घेतला, तरीही ती काहीच बोलली नाही. मला खुप बरं वाटलं.. चला म्हणजे हाअ ड्रेस तरी चांगला आहे.. ना कोरियर बॉय , ना वॉचमन..
स्वतःशिच हासलो, अन पायात सॉक्स घालणे सुरु केले. ओठ शिळ घालत होते, सगळं काही व्यवस्थित झालं की कसं बरं वाटतं नां? आज सकाळीच मस्त ब्रेकफास्ट झाला होता. फोडणीची पोळी अन दही ( शिळी पोळी कुस्करुन फोडणीला घातलेली ( कांदे पोह्या सारखी) मला वाटतं त्याला मुंबईला पोळीचा चिवडा म्हणतात) माझं फेवरेट आहे ते.. बायकोने तिन वेळ चहा पण करुन दिला होता कुरकुर न करता..
तिने न बोलताच तिच्या मनातले विचार मला समजतात , ती नक्कीच मनातलया मनात म्हणाली असेल.. अरे किती चहा पितोस.. एका कपाला दिड चमचा साखर, म्हणजे दिवस भरात, तुझे १५ कप चहा गुणीले दिड चमचा म्हणजे जवळपास २२ चमचे साखर= २०० ग्राम साखर? इतकी साखर तुला आवश्यक नाही रे.. जरा चहा कमी कर… वगैरे वगैरे न एकावं लागल्यामुळे मी अगदी खुष होतो आज!
हं , तर काय सांगत होतो, तयार झाल्यावर मग घराबाहेर निघणार, तेवढ्यात मागुन हळुच आवाज ऐकु आला..
…….’ आई ,आपले (?) बाबा अगदी वेटर सारखे दिसतात की नाही आज ह्या ( काळी पॅंट +व्हाईट शर्ट + टाय) ड्रेस मधे??”
आणि नेमकं ते मला ऐकु आलं.. !!एवढा चांगला तयार होऊन घरून निघालो आणि ही अशी कॉमेंट!! आता काय करणार! तिच्याकडे पाहिलं, एक टप्पल द्यायला मागे वळलो, तर ती धावतच तिच्या बेडरुममधे गेली अन दार लाउन घेतलं.. !! मी पण हसतंच घराबाहेर पडलो..
थोड्या वर्षापुर्वी एक फॅशन होती. काय व्हायचं की पुर्वी लोकं सफारी घालायचे. म्हणजे ज्या कपड्याची पॅंट त्याच कपड्याचा शर्ट. त्याच्या खांद्यावर दोन पट़्ट्या किंवा समोर पॅच खिसा , असा काहीतरी ड्रेस होता तो. बरं फॅशन इतकी होती, की एखाद्या लग्नात वगैरे तर बरेचसे लोक असे सफारी घातलेले दिसायचे.बॅंड वाजवणारे पण असाच काहीतरी ड्रेस वापरायचे. कधी कधी या सफारीचा रंग पण अगदी बॅंडवाल्यासारखा असायचा. घालणाऱ्याची पर्सनॅलिटी अगदी छाडमाड असेल तर तर तो ड्रेस घालणारा आणि लग्नाच्या वरातीमधे बॅंड वाजवणारा, किंवा एखादा ऑफिस मधला चपराशी एकसारखेच दिसायचे.
या बाबतित स्त्रियांचं एकदम पक्कं असतं, की ठराविक साडी, मग यावर मॅचिंग असलेले इतर कपडे, मॅचींग बांगड्या.. इत्यादी.. त्या बाबतित त्या कधिच कॉम्प्रोमाइझ करित नाहीत. पुरुषांचं आपलं मिक्स ऍंड मॅच सुरु असतं नेहेमी.. काळी, राखाडी, किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर आणि कुठलाही पाइन स्ट्रिप शर्ट.. बस.. चलता है. एक पेअर ब्लॅक शु आणि एखादा स्निकर असला की झालं.. और क्या चा्हीये?
एक गोष्ट आहे..अगदी लहानशा गोष्टींचा किती परीणाम होतो नां आपल्यावर? प्रत्येक ड्रेस हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रोफेशनशी निगडीत केला जातो. मग तो ड्रेस इतरांनी वापरला तर लगेच त्या माणसाला त्या प्रोफेशनशी कोरिलेट केलं जातं. सह्ज जाणवलं म्हणुन इथे पोस्ट करतोय.

ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?
आपण ब्लॉग वर काही तरी लिहितो, आणि लोकं ते वाचतात आणि कॉमेंट्स पण देतात. बरेचदा तुम्ही एखाद्या वर्षा पुर्वी लिहिलेल्या पोस्ट वर अचानक पणे पण कॉमेंट येते, आणि तुम्हाला एकदम ’ ही इतक्या जुन्या लेखावर कॉमेंट कशी काय आली ?’ याचे आश्चर्य वाटते . लोकं या इतक्या जुन्या लेखापर्यंत कसे पोहोचतात? हा प्रश्न तर मला कित्तेक दिवस छळत होता.
ब्लॉगची माहिती लोकांच्या पर्यंत कशी काय पोहोचते? मराठी ब्लॉग विश्व वरून हे उत्तर बहुतेकांच्या मनात येईल . ब्लॉग वर लिखाण नविन सुरु केल्यावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे मराठी ब्लॉग विश्व करते. तुमच्या नविन पोस्ट्सना या साईटवरून भेट देणारे लोकं याच साईट वरून येतात! बरेचसे लोकं तुमच्या ब्लॉग ला इमेल मधे सब्स्क्राइब करतात, तुम्ही नविन पोस्ट लिहिली की ते त्यांना मेल मधे समजते .
सर्च इंजीन्स वरून येणारे लोकं पण बरेच असतात. सर्च इंजिन्स मध्ये एखादा कळीचा शब्द लिहून शोध घेतला जातो, आणि जर तुमच्या ब्लॉग वर पण तो शब्द वापरला गेला असेल तर तुमचा ब्लॉग सर्च इंजिन शोधते आणि शोधकर्त्याला तुमच्या ब्लॉग ची यु आर एल दाखवते.
वर्डप्रेस वर जर तुमचा ब्लॉग असेल तर लोकं सर्च इंजिन्स मधे कोणता शब्द शोधून लोकं तुमच्या ब्लॉग वर आले आहेत ते पण समजू शकते. माझ्या ब्लॉग वर आजपर्यंत लोकं कुठल्या टर्म्स वापरून सर्च इंजिन्स वरून आले हे माझ्या ब्लॉग वर चेक केले तर खूप वेग वेगळ्या टर्म्स वापरलेल्या आढळल्या.
सगळ्यात जास्त शोधला जाणारा शब्द म्हणजे स्त्री पुरुष! आणि त्याच्या खालोखाल येतो तो अश्लिल फोटो, नंतर एड्स आणि एड्सचा हल्ला ही टर्म पण बरेचदा शोधलेली दिसून येते.ह्या अशा सर्च सोबतच नेदा इराण, किंवा फारशी लोकांना माहिती नसलेली एक अंदमान निकोबार द्विपसमुहातील ’जुजुब’ नावाची आदिवासी जमात या बद्दल शोध घेतांना पण लोकांनी माझ्या साईटला भेट दिलेली आहे. जवळपास ७५० लोकं ’काय वाटेल ते ’ हे शोधून या ब्लॉग पर्यंत पो्होचले . उखाणे, घर वगैरे शोधून ब्लॉग वर भेट देणाऱ्यांची संख्या पण खूप आहे.
एड्स बद्दल जेंव्हा मराठी मधे शोध घेतात ते कां? त्यांनी काही तरी केलेलं असावं कां की जे करायला नको ते?? आणि मग आपल्याला एड्स झाला तर नाही या शंकेने नेट वर शोधाशोध..तुम्हाला- मला कधी हिजडा, किंवा एड्स वगैरे शोधावेसे वाटत नाही- मग लोकांना का वाटावी? या वर जास्त काही लिहित नाही, फक्त लोकं काय शोधतात ते खाली दिलंय !
बाय द वे, या पोस्टची कल्पना सुचली नॅकोबाच्या ह्या पोस्ट वरून

थोडक्यात जर तुम्हाला ब्लॉग वर जास्त लोकांनी भेट द्यावी असे वाटत असेल ,तर हे जास्तीतजास्त सर्च केले जाणारे शब्द शब्द तुम्ही आपल्या ब्लॉग वर वापरा, म्हणजे ब्लॉग ची व्हिजीब्लिटी वाढेल..हे सगळं शोध म्हणून ठिक आहे. पण लोकं जेंव्हा अश्लिल फोटो असे मराठी मधे लिहून शोधतात तेंव्हा काय उत्तर मिळेल अशी अपेक्षा असेल लोकांची? अश्लिल फोटोंना वाहिलेल्या साईट्स असतांना पण मराठी ब्लॉग बर लोकं का बरं असे शोध घेत असावेत?
एड्स बद्दल जेंव्हा मराठी मधे शोध घेतात ते कां? त्यांनी काही तरी केलेलं असावं कां की जे करायला नको ते?? आणि मग आपल्याला एड्स झाला तर नाही या शंकेने नेट वर शोधाशोध..तुम्हाला- मला कधी हिजडा, किंवा एड्स वगैरे शोधावेसे वाटत नाही- मग लोकांना का वाटावी? या वर जास्त काही लिहित नाही, फक्त लोकं काय शोधतात ते खाली दिलंय !
बाय द वे, या पोस्टची कल्पना सुचली नॅकोबाच्या ह्या पोस्ट वरून
सार्वकालिक
शोधा Views पुरुष स्त्री 3,714 अश्लिल फोटो 2,210 चावट 1,661 स्त्री 1,252 ऑर्कुट 1,143 अश्लिल 672 kayvatelte 611 एड्स चा हल्ला 568 बातम्या बातम्या 497 कविता 432 उखाणे 421 घर 418 अश्लिल कथा 410 एड्स 392 लोकमत 284 मित्र 281 स्त्री आणि पुरुष 233 कथा 224 हिजडा 213 फोटो 181 मुली 168 मनसे 167 क्रिष्ण 159 साईबाबा 153 काय वाट्टेल ते 143 चावट वहिनी 143 neda iran 139 इंटरनेट इंटरनेट 136 al jaffee 136 इंटरनेट 130 गाणी 130 झी टीव्ही 127 jujube 125 arya ambekar 121 इंटरकोर्स 120 जॉब 118 मराठी चित्रपट 116 आर्मी 110 प्रेमात 110 पत्रकारिता 108 वात्रट 106 बॉडी 101 होळी 100 किरण बेदी 97 नेव्ही 93 दुनियादारी 91 जनगणना 89 साई बाबा 82 फोटो काढले 81 सारेगमप 79