Powered by Blogger.

Monday, 2 April 2012

बर्‍याच संकेतस्थळांवर प्रश्न विचारण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन प्रश्न टाईप करण्याची सोय असते. ज्याचे उत्तर काही दिवसांनी आपल्या ई-मेल मध्ये येऊन पडते.
पण आम्हाला वाटते की जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे असते त्याच क्षणी त्या प्रश्नाच्या उत्तराची जास्त गरज असते कारण काही दिवसांनी त्या प्रश्नाचे महत्त्व कमी झालेले असते. त्यामूळे आपल्या विनंती आहे की आपणास जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर संकोच न करता आम्हाला फोन करा. माहित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोत.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यास 'माफ करा ! या प्रश्नाचे उत्तर आम्हाला माहित नाही' असे सांगायला आम्हाला मुळीच लाज वाटत नाही. कारण सर्वच प्रश्नांची उत्तरे एखाद्याला माहित असणे हे शक्य नाही. तरी देखिल आपल्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करु.
एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे आपल्या फोन करण्याची वेळ मात्र योग्य असावी.
Pravin Dhale- मोबाईल क्र. 95 95 875 876

फेसबुक कसे वापराल?

वेबपेज म्हणजे काय

कॉम्प्युटरवर काम करताना आपले काम कॉम्प्युटरमध्ये फाईलच्या स्वरुपामध्ये साठवितो. प्रत्येक फाईलला निरनिराळी नावे देऊन आपण आपल्या फाईल्स कॉम्प्युटरमध्ये साठवित असतो. जसे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये साठविलेली फाईल वर्डची फाईल म्हणून ओळखली जाते. तसेच त्या फाईलला वर्डचा डब्लू (W) हे चिन्ह दिसू लागते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमधिल प्रत्येक निरनिराळ्या सॉफ्टवेअरमध्ये काम करुन ती फाईल साठविल्यानंतर त्या फाईलला आपोआप त्या सॉफ्टवेअरचे चिन्ह दिले जाते.
इंटरनेटवरील वेबसाइटच्या फाईलला वेबपेज असे म्हणतात. खरंतर त्या वेबसाइटच्या फाईलला फाईल न म्हणता वेबसाइटचे पान म्हणजेच इंग्रजीमध्ये पेज असे म्हटले जाते. म्हणूनच वेबसाइटवरील पेजला वेबपेज असे म्हणतात.
पूर्वी वेबसाइटची पाने म्हणजेच वेबपेज एचटीएमएल (HTML) प्रकाराची होती. नंतर वेबसाइटमध्ये झालेल्या प्रगतीमध्ये एचटीएमएल प्रकारासोबत इतरही वेबपेजचे प्रकार बनत गेली.
(टीप: इथे आपण पाहात असलेले हे वेबपेज देखिल एचटीएमएल प्रकारचे आहे. आपण जर ऍड्रेसबारवर पाहिल्यास
http://www.pravindhale.com.html/  शेवटी html असे आपल्याला आढळेल.)

इतिहास इंटरनेटचा

इंटरनेट युगाची खर्‍या अर्थाने सुरुवात १९६९ पासून झाली जेव्हा अर्फानेट (Arpanet) या कामाच्या जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, जे आज देखिल एक वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातील.
पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविन प्रकल्पांची निर्मिती झाली. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरुपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली. नंतर १९७४ च्या सुरुवातीला टिसीपी/आयपी (TCP/IP) चा वापर केला गेला. सर्व नेटवर्कमध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा यामागचा प्रयत्न जो पूढे टिसीपी/आयपी ने प्रचलित झाला.
१९७५ मध्ये जॉन विटल (John Vittal) याने ई-मेलमध्ये नविन सुधारणा आणल्या ज्यामध्ये ई-मेलला प्रतिउत्तर (Reply) देणे व आलेल्या ई-मेलला दुसऱ्याला (Forward) पाठविणे हे महत्त्वाच्या गोष्टी होत्या. १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल हेदरिंगटन (Dennis Hayes and Dale Heatherington) यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला, ज्याप्रकाराला नंतर स्पॅम (spam) असे म्हटले गेले.
१७७९ मध्ये युजनेट (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवीच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करु शकतात. १९८२ पहिल्या अक्षरांद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात :-) हे चिन्ह वापरुन केली. आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी तो :-) हे हसण्याची चिन्ह वापरत होता. यालाच आताचे इमोशीकॉन (emoticon) असे म्हणतात, जे आपण ई-मेल आणि चॅटींगमध्ये वापरतो.
१९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS)) ची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्या प्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्याने पुर्वीच्या आयपी ऍड्रेस मधिल क्रमांकाएवजी हे लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर त्याचे रुपांतर आपोआप नंतर आयपी ऍड्रेस मधिल क्रमांकामध्ये होत असेल. १९८५ मध्ये काल्पनिक समुहाची निर्मिती केली, तेव्हा निर्माण केलेली द वेल (The Well) ही आजदेखिल इंटरनेटवरील एक प्रभावशाली समुह (community) आहे.
१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये इंटरनेटवरील पहिल्या गप्पागोष्टींचे सहक्षेपण (Internet Relay Chat) केले गेले जे आज आपण चॅटींच्या स्वरुपात वापरतो. तर तेव्हाच म्हणजे १९८८ मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या अडचणीला समोर आणले.
१९८९ मध्ये अमेरीका ऑन लाईन म्हणजेच AOL (America Online) ची निर्मिती झाली. ज्यामूळे नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये इंटरनेट लोकप्रिय होण्यास कारणीभूत झाला. त्याच साली म्हणजे १९८९ मध्ये वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web) ही संकल्पना टीम बर्नर-ली (Tim Berners-Lee) यांनी अस्तिताव आणली. जी पूढे खऱ्या अर्थाने १९९० पासून सुरु झाली.
१९९० च्या सालामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारे प्रगती झाली. यासाली द वर्ल्ड (The World) या पहिल्या व्यावसायिक डायल-अप इंटरनेट सेवा पुरविणाऱ्याची (dial-up Internet provider) सुरुवात झाली. १९९१ मध्येच पहिले इंटरनेटवरील पान म्हणजेच वेबपेज बनविले गेले. १९९० मध्येच गोफर (Gopher) या पहिल्या शोध प्रणालीची देखिल निर्मिती झाली, जी फक्त फाईलचे नावच नाही तर त्यातील मजकूरदेखिल शोधत असे. याच साली एमपीथ्री (MP3) या प्रकाराला सर्वमान्यता मिळाली. हा फाईलचा प्रकार आजदेखिल आवाजाच्या आणि गाण्याच्या फाईलसाठी जगप्रसिद्ध आहे. १९९१ मध्येच इंटरनेटवरील अतिमहत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेऱ्याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला.
पुढे १९९३ मध्ये सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफिकल (graphical) इंटरनेट ब्राऊझर उपलब्ध झाला. खरंतर सर्वात पहिला इंटरनेट ब्राऊझर नव्हता, जास्त तांत्रिक गुंतागुतीचा नसुन तो परंतू तो वापरायला अतिशय सोपा असल्याने तो लगेचच सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राऊझर बनला. १९९३ मध्येच अमेरिकेतील व्हाईट हाऊस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या ज्यामूळे तेव्हा वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच .gov आणि .org या दोन वेबसाइटच्या नावाची निर्मिती झाली. १९९४ मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राऊझरला नेटस्केप नॅविगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राऊझर तयार झाला.
१९९५ मध्ये बँकेचे तसेच क्रेडीट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राऊझर आवश्यक भासू लागली. या आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीनेच सुरक्षित असा SSL (Secure Sockets Layer) प्रणाली असलेला ब्राऊझर तयार केला. कारण याच साली Echo Bay या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाइटची निर्मिती झाली जी आज eBay नावाने ओळखली जाते. याच साली Amazon.com या वेबसाइटची देखिल निर्मिती झाली. असे असले तरी जवळपास ६ वर्षांपर्यंत म्हणजेच २००१ पर्यंत या वेबसाइटला कुठलाच आर्थिक फायदा झाला नव्हता. १९९५ मध्येच सर्वसामान्यांना देखिल इंटरनेटवर आपली मोफत वेबसाइट बनविता यावी यासाठी Geocities या वेबसाइटची देखिल निर्मिती झाली जी २००९ मध्ये वार्षीक होणाऱ्या मोठ्या नुकसानामुळे बंद करावी लागली. याच साली नेटस्केप नॅविगेटर ब्राऊझरच्या माध्यमातूनच सर्वप्रथम जावा आणि जावास्क्रिप्ट या प्रोग्रॅम प्रणालीची ब्रेंडन इच (Brendan Eich) याने नेटस्केप नॅविगेटरचा एक भाग म्हणून निर्मिती केली.
१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल (HoTMaiL) या ऑनलाईन मोफत ई-मेल सेवा सुरु झाली. १९९७ मध्ये "weblog" या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची निर्मिती केली गेली.
१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल या सर्च सेवा पुरविणारी वेबसाइट सुरु झाली. याच साली नेटस्केप कंपनीने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला. १९९९ मध्ये सेटी (SETI) हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख कॉम्प्युटरना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते परग्रहावरील सजीवांचा शोध घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोप जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटी द्वारे केले जात होते.
२००१ मध्ये विकिपीडिया (Wikipedia) या इंटरनेटवरील माहितीच्या विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये तयार झालेल्या स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला म्हणजेच Voice over IP calling ला सुरुवात झाली. याच साली MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरु झाल्या आणि खऱ्या अर्थाने सोशल नेटवर्किंगला सुरुवात झाली.
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नविन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये युट्युब (YouTube) या विडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरु झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्विटर (Twitter) सुरु झालेल्या अजून एक वेबसाइटने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्विटर या वेबसाइटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकता.
२००७ मध्ये ऍपल कंपनीच्या आयफोनद्वारे मोबाईल वेब प्रणाली उदयास आली. यानंतर इंटरनेटवर दररोज नवनविन कल्पना समोर आल्या. सध्या दिवसागणिक हजारो वेबसाइटची निर्मिती होत आहे. सर्व विषयावरील, क्षेत्रातील, भाषांच्या, व्यक्तींच्या, कंपन्यांच्या, संस्थाच्या माहितीनी इंटरनेटचे जग प्रसरण पावत आहे. भविष्यामध्ये हे इंटनेटचे विश्व आकाशाप्रमाणे अनंत होईल यात शंका नाही.

वेबसाइट सर्फींग म्हणजे काय?

आपण इंटरनेटवर ज्या निरनिराळे संकेतस्थळ पाहतो त्या संकेतस्थळावरील आतील निरनिराळ्या लिंकवर क्लिक करुन आपण त्या संकेतस्थळावरील इतर पाने पाहतो यालाच ‘वेब सर्फींग’ असे म्हणतात. निरनिराळ्या संकेतस्थळांवरील माहितीची पाने चाळण्यासोबत ई-मेल वापरणे हा देखिल वेब सर्फींगचाच भाग आहे.

Sunday, 1 April 2012

Font Download

RTGS transactions to become more bank customer friendly

April 8, 2009: The RTGS system implemented by the Reserve Bank has been in operation for more than four years. The system has also stabilised over the years and has been witnessing increased coverage in terms of bank branches and transaction volume.The volume of RTGS (Real Time Gross Settlement System ) transactions is increasing rapidly. RTGS settled 1.94 million transactions in the month of March 2009 as against 0.72 million transactions in March 2008. Customer transactions settling in RTGS presently constitute 89 percent of total RTGS transactions and are growing.

At a recent meeting with major banks, Reserve Bank of India reviewed the entire gamut of RTGS customer transactions with a view to making them more user friendly. Based on these discussions, the following decisions have been taken for implementation by RTGS member banks latest by June 01, 2009.

1. It is treiterated that in a Straight Through Processing (STP) environment, standardization is very much necessary and uniformity in message format is a pre requisite for the success of STP.

2. RTGS Customers have been complaining that there is no uniformity on information provided to the customer in the pass books / account statements by different banks. Some banks merely indicate `RTGS credit’ without details while other banks are giving sender's bank account number or UTR number of the transactions etc. Customer is receiving multiple RTGS credits on a given date, is at a loss to understand the source of funds leading to reconciliation issues.

RBI has therefore, advised that

a) A bank customer receiving RTGS credit shall be provided with the name of the remitter in his account statements / pass book.

b) A bank customer sending a RTGS remittance shall be provided with the name of the beneficiary in his account statements / pass book.

The banks are free to provide any additional information as they deem necessary / useful.